धानाने भरलेला वाहन कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीने केला जप्त.


■ समितीचे सचिव लोकेश सोनुने यांनी केली कारवाई.
—————————-
गोंदिया ( देवरी ) : देवरी वरून अवैधरित्या धान खरेदी करुण चिचगड-ककोडी मार्गे  वाहतुक करूण छत्तीसगड राज्यातील  हाटबंजारी येथे नेत असतांनी गणूटोला येथे मंगळारी (ता.२४ डिसेंबर) रोजी दुपारी २.४० वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे सचिव लोकेश सोनुले आणि त्यांच्या भरारी पथकाने एक वाहन जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.यात २०० धानाचे कट्टे  ८० किवंटल प्रमाणे १ लक्ष ६० हजाराचे धान आणि वाहनाची अंदाचे किंमत ५ लक्ष प्रमाणे असे एकूण ६ लक्ष ६० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केले आहे.
       मिळालेल्या माहिती प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे कार्यक्षेत्र हे तालुका देवरी व तालुका सालेकसा येथील संपूर्ण गावापूर्ण मर्यादित आहे. सदर कार्यक्षेत्रातील अवैध धान्य खरेदीवर नियमन व नियंत्रण करणे हे समितीचे कामे असतात या अनुसंघाने दि.२४/१२/२०२४  रोज मंगळवार रोजी  दुपारी १२:३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीने देवरी येथील कार्यालयातून अवैध धान खरेदीवर नियमण व नियंत्रण (आळा घालण्या करिता) व तपासणी करीता निघाले तेव्हा  देवरी-चिचगड-ककोडी मार्गावर गणुटोला येथे दुपारी २:४० वाजेच्या सुमारास वाहन क्रमांक सी. जी.०८ व्ही. ६०१५ वाहन मालक मानिक शाहू राहणार हाटबंजारी(छ.ग.) यांनी चालकाच्या सहाय्याने देवरी वरून अवैधरित्या धान खरेदी करून छत्तीसगड राज्यातील हाटबंजारी नेत असतांनी कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे सचिव लोकेश सोनुले आणि त्यांच्या भरारी पथकाने पकडून त्याच्या विरूध्द महाराष्ट्र कृषी पनन विकास व विनीमयन अधिनियम १९६३ चे कलम ३२ (अ) मधिल तरतुदी नुसार कार्यवाही करुन सदर गाडी ही जप्त करून आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यांच्या या कार्यवाहीमुळे देवरी व सालेकसा तालुक्यात अवैधरित्या धान खरेदी करणा-या व्यापा-यांचे धाबे दनानले आहे.
        या कार्यवाहीत वाहनात भरलेले २०० कट्टे अंदाजे  ८० किवंटल प्रमाणे १ लक्ष ६० हजार आणि वाहनाची अंदाजे किंमत ५ लक्ष रूपये असे एकूण ६ लक्ष ६० हजार रूपयाचा मुद्देमाल  जप्त केले आहे. ही कार्यवाही कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे सचिव लोकेश सोनुने आणि त्यांच्या भरारी पथकाने केली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें