धोबाटोला येथिल अरमान बियर बारच्या विरोधात आम्ही स्वताच लढत आहो आम्हाला कुणाची मदत नाही…

बार बंद साठी गावातीलच लोकांचा पुढाकार ….

गोंदिया ( देवरी )  ;  मागील तीन महिन्यांपासून बियर बार विरोधात सुरू असलेल्या देवरी तालुक्यातील धोबाटोला येथील ग्रामस्थांचा अखेर धीर सुटून संतप्त गावकऱ्यांनी थेट बियर बारकड़े आपला मोर्चा वळवत बियर बार मध्ये तोडफोड केली होती. हि घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेत ककोडी येथील काही मोठ्या व्यक्तीचां सहकार्य व आर्थीक मदत गावातील नागरीकांना केल्याच्या चर्चेला उधान असतांनी धोबाटोला येथिल नागरीकांनी हि चर्चा खोटी असुन आम्हाला कुनाचीही मदत मिळाली नसुन आम्ही गावातील नागरीकांकडुन वर्गनी जमाकरुन आज पर्यंत खर्च करत आंदोलन करत असल्याचे धोबाटोला गावातिल व्यक्तीकडुन सांगण्यात आले आहे.
विशेषत: 18 फेब्रुवारीला प्रशासनातर्फे बार बंद कि सुरू यावर मतदान प्रक्रीया राबविण्यात आली होती. परंतू मदतान प्रक्रियेवेळी झालेल्या गोंधळामुळे ती मतदान प्रक्रिया तहकुब करण्यात आली होती. मतदान प्रक्रीया तहकुब होताच गावातील नागरीक हे अक्रोषात येत बारची तोड फोड केली ज्यात चिचगड पोलिसानीं 30 ते 35 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. धोबाटोला गावातील महिला आजही अरमानच्या बारच्या विरोधात असुन जेव्हांपर्यंत प्रशासन बार बंद करनार नाही तोपर्यंत आम्ही सतत आंदोलन करनार असल्याचा गावातील नागरीकांनी सांगितले आहे.

प्रतिक्रीया….

ग्रामपंचायस हद्दीत सात टोले येत असुन त्यात धोबाटोला हाही टोला आहे. धोबाटोला येथुन ककोडी जानार्या मार्गावर अरमान बार आहे. हि बार उघडली तर आमचे घर उध्वस्त व्हायला वेळ लागनार नाही. आम्ही हि बार सुरु होऊ देनार नसुन ह्या बार विरोधात आम्ही लढतच राहनार. अनेक महिन्यापासुन गाव वर्गनिकरुन व कुणाच्या सहकार्या सिवाय संपुर्ण गावातील नागरीक धरने आंदोलन केली. ज्यात अह्माला गावातील नागरीकां व्यतिरीक्त ईतर कुणाचा सहकार्य मिळालेला नाही.

       – जोती संजु हलामे (गावातील महीला)

प्रतिक्रीया…
  
नागरीकात चर्चा आहे की, धोबाटोला येथिल नागरीकानां काही लोकांनी पैसे देऊन आंदोलन करायला सांगीतले जाते, बार तोडायला सांगीतले जाते. पण हे सगळे आरोप खोटे असुन असला कुठलाही विषय नसुन गाव वर्गनीतुन आम्ही आजपर्यंत लढा दिला व समोरही लढा देनार आहोत.

     – सेवंता भगतराम सर्पा (गावातील महीला)

प्रतिक्रीया..

धोबाटोला येथील अरमानबार विरोधात झालेल्या तोडफोडीत 30 ते 35 नागरीकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. ज्यात काही महिला पण आहेत. व हे सगळे परिसरातील सातही गावातील नागरीकांनी स्वमर्जीने ही बार या परीसरात पाहीजे नाही या करीता केले असुन तपासात कुणी बाहेरचे व्यक्ती या नागरीकांना मदत केली किवा करीत आहेत असे निदर्शनास आलेले नाहीत.

        – जनार्धन हेगडकर (ठाणेदार चिचगड)

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें