नगरपंचायतीला कायम स्वरूपी मुख्याधिकारी नाही.

■ देवरी नगरपंचायत येथील प्रकरण.

देवरी : देवरी नगरपंचायतीला कोणी मुख्याधिकारी देता का? असे म्हणण्याची वेळ पदाधिकारी व नगरसेवकांवर आली आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी दयावी अशी मागणी देवरी येथील बुध्दजीवी नागरीकांनी केली आहे.    
           एवढेच नव्हे तर मुख्याधिकारी अभावी शहराचा विकास खुंटला असुन नगरपंचायच्या पदाधिकारी व नगरसेवकावर बेमुदत आंदोलन करतील की काय? असा ही समज देवरी शहरातील नागरीकांत झाला आहे.
             माझी वसुंधरा अभियानात नाव लवकीक झालेल्या देवरी नगरपंचायतीत अनेक महिन्यांपासून मुख्याधिकार्‍यांसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.
देवरी नगरपंचायतीत मुख्याधिकारी, शहर अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक, गट क, श्रेणी ब, नगररचना सहायक अभियंत, कर निरीक्षक,सहायक करनिरीक्षक असी अनेक पदे प्रभारी प्रतिनियुक्तीवर आहेत.    
           वरील सर्व पदावर अधिकारीयांची देवरी नगरपंचायतमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती होणे गरजेचे असल्याचे शहरातील नागरीक बोलत आहे.
            नगरपंचायतीत प्रतिनियुक्तीवरील नियुक्त आणि अनेक पदे रिक्त असल्यामुळे देवरी शहरातील नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. कामाचा आराखडा वेळेवर न होणे, बिले अदा न होणे, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, वैयक्तिक शौचालय प्रकरणे, बांधकाम परवाने, नवीन जागेच्या नोंदी, पाणीयोजना, विद्युत विभाग व नगरसेवकांच्या प्रभागातील कामे खोळंबली आहेत. यासंदर्भात नगरविकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास अगोदर बर्‍याचदा पत्रव्यवहार करूनही कायमस्वरूपी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. हीपदे रिक्त राहिली. त्यामुळे सर्व पदाधिकारी वेळेनुसार जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसतीलकी काय? यावर नगरपंचायतचे पदाधीकारी व नगरसेवक यांच्यात कुजबुज शुरू असुन अशी शहरातील नागरीकामध्ये चर्चा आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें