साळकरी विद्यार्थी व महिलानां त्रास…
नागरीकांनी दिले संबधित विभागाल निवेदना स्वरुपात तक्रार ….
गोंदिया ( देवरी ) ; शहरातील प्रभाग क्रमांक 17 येथिल मुख्य रसत्यावर असलेल्या ऐलिफंटा बारच्या दुकानांच्या बाहेर सकाळपासून संध्याकाळी दुकान बंद होईपर्यंत तळीरामांचे दारू पिण्यासाठी ‘ओपन बार’ रोज भरत आहेत. मुख्य रसत्यावर तळिराम वाहने उभी ठेवित असल्यामुळे त्या रसत्यानीं येनार्या – जानार्या विद्यार्थी, महिला , दुचाकी , चारचाकी व गावातील सामान्य नागरीकांना या ऐलिफंटा बारच्या अनियमततेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषता बारच्या काही अंतरावरच अंगनवाडी व पाचसे मिटरच्या आतच शाळा असुनही या परिसरातच ही बार शाळांच्या परिसरात आहेत. त्यामुळे त्या रसत्यानीं येनार्या – जानार्या विद्यार्थी , महिला व वाहनचालक याचा त्रास होत आहे. विशेषता या बारला नगरपंचायत देवरीने परसटोला येथे बार सुरु करन्याची परवानगी दिली नसल्याचीही चर्चा आहे. ज्यामुळे संबधीत विभागाच्यागही कार्यप्रनालिवर प्रश्न चिन्ह ? निर्मान केल्या जात आहे. परसटोला येथिल ऐलिफंटा बार ठिकानीच तळीराम सकाळपासून दारू पित बसलेले असल्यामुळे तळीरामाच्यां वाहनाच्या रागां तासन – तास लागत असल्याने परसटोल्याचा मुख्य रस्ता तळीरामांनी ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. या संदर्भात परसटोला प्रभाग क्रमांक 17 येथील नागरीकांनी देवरी नगरपंचायत, राज्य उत्पादन शुल्क विभाग व देवरी पोलिस्टेसनला निवेदनाच्या स्वरुपात तक्रार दिली आहे.
साहेब या भागावर आपले लक्ष आहे का ?
देवरी शहराच्या प्रभाग क्रमाकं 17 परसटोला येथे दोन बार आहेत. व हि दोन्ही बार मुख्य रसत्यावर आहेत. तर परसटोला प्रवेशावरच ऐलिफंटा बार आहे. त्याठिकाणी तळिराम दोन – दोन तास आपली वाहने भर रसत्यावर उभी ठेवत रस्ता बंद करतात. विशेषता सायंकाळी 6 वाजेपासूनच या ऐलिफंटा बार समोरील रसत्यावर वाहनांची गर्दी दिसते. व रात्रीपर्यंत तळीरामांचा वावर सुरू असतो.
परसटोल्याच्या मुख्य प्रवेश द्वारा लगदच बार…
परसटोला प्रभाग क्रमांक 17 च्या मुख्य प्रवेश द्वारावरा लगदच ऐलिफंटा बार आहे. परिसरात अंगनवाडी व शाळा असुन याच मुख्य मार्गाने विद्यार्थानां व रोजदांरीच्या कामाला येनार्या – जानार्या महिलांना ये – जा कराव लागते. विशेषता परिसरातीलच नागरीकांच्या घरासमोरच हे तळिराम दारुच्या नसेत लघवी करने , वाहने उभी सरने , तासनतास उभे राहने शिविगाळी करने ज्याचा चांगलाच त्रास बार सेजारी असलेल्या रहवाश्याना होत आहे. तरी देखील बार मालकाच्या निष्काळजिपनाचा त्रास मात्र प्रभाग क्रमांस 17 येथिल विद्यार्थी , महिला व गावातील नागरीकांना सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर वाहने ; कारवाया किती ?
देवरी शहर पोलिस काहीवेळा दारू विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करतात; मात्र बार मालकाच्या अनयमीततेवर कोणतीही कारवाई होत नाही. हे तळीराम बिनदिक्कतपणे भर रसत्यात दुचाकी – चारचाकी वाहने उभी ठेऊन दारू ढोसतात. त्यांच्यावर कोणाचेही बंधन नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी ठेऊन दारू ढोसणाऱ्या तळीरामांची संख्या परसटोला प्रभाग क्रमांक 17 येथे दिवसेंदिवस वाढत आहे. शाळा परिसरात व रस्त्यावरच चालविण्यात येणाऱ्या ओपन बारवर शहर पोलिस व उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक 17 परसटोला येथिल मुख्य रस्त्यावरील ऐलिफंटा बारच्या तळीरामांचा संचार अधिक वाढत असल्याने वाहनाच्या रांगा तासन तास दिसत असल्याचे चित्र आहे.









