देवरी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भागी येथे क्रांतीज्योती ज्ञानज्योति माता सावित्रीमाई यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमचे अध्यक्षस्थान श्रीम. टेकाम मॅम तर उपाध्यक्षस्थान श्रीम. कोकावार मॅम यांनी भूषवले. तर विद्यार्थ्यांसह शालेय शिक्षकांनी मनोगताद्वारे सवित्रीमाईंना आदरांजली वाहिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 5 वीच्या कु. शेजल कु. आरोही कु. ओजस्वी यांनी पार पाडले. सुत्रसंचालनाद्वारे लहान बालकांना छान खिळवून ठेवले. यासोबतच सकाळपासून `चित्रकला, निबंधस्पर्धा, रंगोळीस्पर्धा` यासह विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला व सर्व स्पर्धांचा आनंद घेतला.
सरतेशेवटी कु. प्रणिती वर्ग 5 वी हिने उपस्थितांनाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.









