देवरी : स्नेह संमेलन हे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जुळण्याचे एक साधन आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे व त्यांच्यातील सृजनशीलता व अभिव्यक्तीचे साक्षात्कार पालकांना व्हावे, यासाठी स्नेहसंमलनाची आवश्यकता असते. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे प्रतिपादन तालुक्याच्या भागी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित तिन दिवसीय वार्षिक स्नेहसंमलनाप्रसंगी उपस्थित अतिथी यांनी मार्गदर्शन करताना केले.
भागी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे दिनांक ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ असे तिन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिनांक ३० जानेवारी रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक गोटाबोडी ग्रामपंचायतचे सरपंच मनोहरजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाला सह उद्घाटक म्हणुन कल्पनाताई वालोदे यांचे प्रतिनीधि म्हणुन सामाजीक कार्यकर्ता नितेशजी वालोदे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन देवरी पोलीस्टेसनचे पोलीस निरीक्षक प्रविण डांगे साहेब होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केन्द्रंप्रमुख ओमप्रकाश ढवळे, शाळा व्यव.अधक्ष जांगळे, उपाध्यक्ष मुकेश खरोले, गट समन्वयक धनंतराव कावळे, पोलिस पाटील विनोद अमृतकर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवशंकर वडगाये, पत्रकार मोहसीन अंसारी ग्रामपंचायत सदस्य मलेश चवरे, दिपक बावनथडे, मायाताई मरसकोल्हे, मयुरीताई अमृतकर, पुस्तकलाताई सलामे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस निरीक्षक प्रविण डांगे यांनी विद्यार्थी जीवनात स्नेहसंमेलनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच मनोहर राऊत यांनी समयोचित मार्गदर्शन करून स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साध्य होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अंगनवाडी चिमुकल्यांपासून इयत्ता सहावीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य व नाटकांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याची ओळख असलेल्या झाडीपट्टीच्या दंडाराचे सादरीकरणही मुख्याध्यापक नरेन्द्रं अमृतकर यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांनी केले.
