पी.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमीक शाळा भागीचे  वार्षीक स्नेहसंमेलन थाटात संपन्न.

प्रशासकिय अधिकार्यांसह जनप्रतिनीधिंचा सत्कार. . .

गोंदिया ( देवरी ) : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पी.एम.श्री. जिल्हापरीषद प्राथमीक शाळा भागी येथे शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात संपन्न झाले. मुलांच्या कलागुणांच प्रत्यक्ष विकास व्हावा यासाठी शाळेकडुन दि.30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 असा तिनदीवसीय स्नेहसंमेलन आज संपन्न झाले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन म्हणुन  देवरी पंचायत समितीची नवनियुक्त सभापती अनिल बिसेन, अध्यक्ष म्हणुन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धात्रक व प्रमुख पाहुने म्हणुन सहाय्यक पोलिस नरीक्षक गिता मुळे, डॉ. अमित येळे ,वनामी फाऊन्डेसनच्या जिल्हा महिला अध्यक्षा शिल्पा बांते, देवरी प्रकल्प विभागाचे दिनेश कुंभरे, बाल विकास विभागाचे पटले साहेब, सरपंच मनोहर राऊत, पत्रकार मोहशीन अंन्सारी, गायधने सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आरती जांगळे , उपाध्यक्ष मुकेश खरोले यांच्या हस्ते मॉ सरस्वती व सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूज़न करुन कार्यक्रमास सुरूवात करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सभासद मुख्याध्यापक नरेन्द्रं अमृतकर शाळेतील संपुरण शिक्षक तसेंच पालक व गावातील महिला -पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देत कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थांनी कलाविष्काराची अनेक गाणीसादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. गाण्यावर पालकासह उपस्थितांनी दाद दिली. दोन दिवस झालेल्या कार्यक्रमासाठी चिमुकल्यांनी केलेली वेशभूषा रसिकांचे लक्ष वेधून घेत होती. पाहुन्यांनी विद्यार्थांना भरघोश बक्षीसे देत त्यांचे मनोबल वाढवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षिका कु.अरुणा टेकाम, कु. योगीता नेवारे, कु. फालु कुमोटे, सौ. रुशाली अमृतकर, सौ. पुणक कोकावार , सौ. गीता लिल्हारे, शिक्षक लाडे सर, बन्सोड सर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर  कार्यक्रमाचे संचालन शिक्षीका कु. योगीता नेवारे, प्रस्तावना मुख्याध्यापक अमृतकर सर व पाहुन्यांचे आभार लाडेसर यानीं मानले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें