पेट्रोल पंपावरील सेवा उरल्या फक्त कागदावरच….

देवरी शहरातील पेट्रोल पंपावर सुविधेचा अभाव….
नियम पायदळी तुडवून जिवघेणा खेळ सुरू….

गोंदिया ( देवरी ) ; शहरातील पेट्रोल पंपांवर कंपनीने निश्चित केलेल्या सुविधा वाहन धारकांना पुरविल्या जात नसल्याचे चित्र देवरी शहरात आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरणार्या ग्राहकांना मोफत हवा,पाणी,शौचालयाची व्यवस्था करणे पेट्रोलपंप मालकांना अनिवार्य आहे. परंतु देवरी शहरामधील पेट्रोल पंपांवर मूलभूत सुविधा पैकी काही ठिकाणी पाणी तर काही ठिकाणी हवा आणि शौचालयाच्या सुविधांचा अभाव आहे.
देवरी शहरामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे पाच पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोल पंपांची पाहणी केली असता अनिवार्य सेवा देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल पंपावर मोफत हवा देणे बंधनकारक आहे. ग्राहक पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी गेल्यानंतर तो गाडीत मोफत हवा भरून घेऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोफत हवा भरण्यासाठी मशीन बसविण्यात आल्या आहेत. परंतु ते अनेक वर्ष महिन्यापासून मशीन बंद असल्याचे कर्मचाच्यांकड्न सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्याची सोय करणे बंधनकारक आहे. परंतु शहरातील काही पेट्रोल पंपवर  पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही तर काही ठिकाणी फिल्टर बंद स्वच्छतेचा अभाव आहे. पेट्रोल पंप मालक/मेॅनेजर स्वतःसाठी थंड जारची व्यवस्था करतात ही दिसते. पण ग्राहकांना काय..? असा  प्रश्न निर्माण होत आहे.
महिला व पुरुषांसाठी स्वतत्रं स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. देवरी येथे पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह आहेत. परंतु काही पंपावर पाण्याची सोयनाही. त्यामुळे स्वच्छतागृह असून ते केवळ दाखविण्यासाठीच असल्याचे दिसून येते. सुविधांचा अभाव असतांना प्रशासनाला मात्र हे दिसत नाही. प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटी (फर्ट एड बॉक्स) ठेवणे आवश्यक आहे. त्याकडे ग्राहक जास्त लक्ष देत नाहीत. परंतु आपत्कालीन व्यवस्था असणे महत्वाचे आहे. दररोजच्या मूलभूत गरजा हवा,पाणी याकडे मॅनेजर दुर्लक्ष करत असतात तर प्रथमोपचार बाबत विचार करणे हे वेगळे ठरेल. पेट्रोल पंपावर मोबाईल वर बोलण्यावर निषिद्ध असतांना सर्वच कर्मचारी सर्रास मोबाईलचा वापर करतात.  पंपावर लोकांना ब्रम्हज्ञान सांगणार्या कर्मचार्यांनी नियम पायदळी तुडवून जिवघेणा खेळ सुरू केल्याचे आढळून येते. यामुळे सर्वसामान्यांच्या जीविताची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाची? पेट्रोलपंप चालकांची का सुस्त शासकीय यंत्रणांची व निष्क्रिय अधिकार्यांची? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब