जीवन आधार बहूउद्धेशीय सामाजिक संस्थेचे आर्थिक सहाय्य
गोंदिया ( गोठनगांव ) : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा. यांचे संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक पाटील सा, पोलिस स्टेशन केशोरी चे ठाणेदार श्री. मंगेश काळे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन केशोरी अंतर्गत एओपी गोठणगाव येथे जीवन आधार बहूउद्धेशीय सामाजिक संस्था नागपूर चे अध्यक्ष जीवन जवंजाळ व मा. काळे सर ठाणेदार केशोरी यांच्या आर्थिक मदतीने व सहकार्याने परिसरातील आगामी पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या होतकरु व गरजुवंत विद्यार्थ्यांना मोफत रनिंग शूज (SEGA Comfert) चे वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रम मा. काळे सर ठाणेदार केशोरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून गोठणगाव व पोलिस स्टेशन केशोरी परिसरातील 31 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सदर कार्यक्रम एओपी गोठणगाव चे प्रभारी अधिकारी पोलिस उप निरीक्षक गित्ते यांच्या पुढाकाराने व जिल्हा पोलिस चे अंमलदार अंबुले, मडावी, भोवते, थेर, मिसार व एस.आर.पी.एफ. चे अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने पार पडला. आदिवासी व नक्षल प्रभावित भागामधील गरजवंत विद्यार्थी या संधीचा फायदा घेऊन आगामी पोलीस भरती मध्ये भरघोस यश संपादन करुन आपला भविष्य उज्वल करतील अशी आशा मा. काळे सर ठाणेदार केशोरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.









