प्रशासनाची तोंडदेखी कार्यवाही ; देवरी शहरासह तालुक्यात अवैध रेती वाहतूक जोमात

देवरी :  देवरी तालुक्यामध्ये प्रशासन आणि स्थानिक राजकारणी यांच्या संगणमतातून अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे वृत्त आहे. या प्रकारामुळे अवैध रेती वाहतुक करणारे आणि अवैध रेतीची विक्री करणाऱ्या संबंघित दलालांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय तालुका प्रशासन करीत असलेली तोंडदेखली कार्यवाही या आगीत तेल ओतत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तालुक्यात असलेल्या रेती घाटांचा अ्द्याप लिलाव करण्यात आला नाही. यामुळे तालुक्यात होत असलेल्या बांधकामासाठी विशेषतः शौचालय बांधकाम आणि घरकूल बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचा पुरवठा हा अवैधरीत्या होत आहे. यासाठी तालुक्यातील घाटावरील रेतीची स्थानिक लोक ही ट्रॅक्टरमार्फत अवैध रेतीची वाहतुक करीत आहेत. तर सोबतच ईतर राज्यातुन, जिल्ह्यातुन व तालुक्यातून  ट्रक – टिप्पर च्या माध्यमाने रात्री देवरी शहरासह तालुक्यात रेतीची वाहतुक सर्रास पणे केली जात आहे. 

स्थानिक राजकारणी आपल्या लोकांना वाचविण्यासाठी अशा प्रकारे रेती रिकामी करून अधिकारी येण्यापूर्वी पसार होण्यास मदत करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी शासनाने प्रती ब्रास दंडाची रक्कम लाखो रुपये केली आहे. या बाबीचा फायदा स्थानिक राजकारणी आणि अधिकारी मोठ्या प्रमाणावर उचलत असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक राजकारणी मंडळी ही अशा रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून त्यांचे कडून  हजार-पाचशेची मागणी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांनी मागणी पूर्ण केली नाही,असा वाहनचालकांना अडवून तालुका प्रशासनाला तेथे पाचारण करण्यात येते. तालुका कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या वाहनचालकांकडून अंदाजे प्रती ब्रास 1 लाख 2 हजार रूपये दंड आकारला जातो. या कार्यवाहीत तालुका प्रशासन हा निष्पक्ष कार्यवाही करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वाहनचालकांकडून 10-15 रुपयांची चिरीमीरी घेऊन वाहन सोडण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

या संबधी अधिकारी, राजकारणी आणि वाहनचालक यांच्यामध्ये अनेकदा प्रकरण हातघाईवर आल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना वाहनचालकांकडून अवैधरीत्या वसूली करणाऱ्या मंडळींवर तसेच कार्यवाहीत भेदभाव करून मलई खाणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी तालुकावाशीयांनी केली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें