ब्रेकिंग…वाघाच्या हल्यात महिला ठार..

भंडारा ( लाखनी ) ; भंडारा तालुक्यातील कवलेवाडा (आमगाव/दि.) येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना कोब्रा बटालियन लगतची असल्याची माहिती आहे. अनेक लोक घटना स्थळी उपस्थित आहे व वाघ महिलेच्या मृतदेहा शेजारी असुन नागरीक वाघाला दुर हाकलन्याचा प्रयत्न करीत आहेत. वन विभागाचे एकही कर्मचारी अजुनही घटना स्थळी दाखल न झाल्याने नागरीकात रोस निर्माण झाला आहे. नंदा  खंडाते रा. कवलेवाडा असे वाघाच्या हल्यात मृत महिलेचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें