गोंदिया ( देवरी ) ; देवरी तालुक्याच्या पालांदुर/जमी क्षेत्राच्या ग्रा.प.पळसगाव/चुटिया अंतर्गत ग्राम धमदिटोला येथे मुलिच्या गावी मुलिच्या बाळतपना करीता आलेल्या महिलेचा वाघाने शिकार रात्री दरम्यान शिकार केला असुन त्या महिलेचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्याच्या आलेवाडा येथिल मुळची रहिवाशी असलेली प्रभा शंकर कोराम (वय-49 वर्षे) हि महिला मुलिच्या बाळतपना करीता मुलिच्या पळसगाव/चुटीया या गावी आली होती. काल दि.26 च्या रात्री 12.30 वाजता सगळे घरी झोपले असतानीं वाघाने घरात शिरत महिलेवर हल्ला केला ज्यात प्रभा शंकर कोराम या महिलेल्या घरा परिसरात असलेल्या झुळपात नेत वाघाने तिचा शिकार केला ज्यात त्या महिलेचा मृत्यु झाला आहे.
या घटनेने गावातिल नागरीक आक्रमक झाले असुन संबधित विभागा विरोधात गावातील नागरीक आक्रमक झालेले आहेत. गावातिल नागरीकांचा म्हणने आहे की, जेव्हां पर्यंत वनविभागाचे अधिकारी येनार नाही तोपर्यंत वाघाच्या हल्यात मृत झालेल्या महिलेचा अंतिम संस्कार करनार नाही. सदर घटना ही या गावात दुसर्यादां झाली असुन वनविभागाच्या कामचुकार पनावर गावातील नागरीकांचा रोश अजुन कायम आहे. जो पर्यंत मृत महिलेला मुआवजा शासनाकडुन मिळनार नाही तो पर्यंत वाघाच्या हल्यात मृत्यु झालेल्या प्रभा कोराम या महिलेचा अतिंम संस्कार करनार नसल्याचे मत गावातील नागरीकांनी मांडले आहे.









