कोरची तालुक्यातुन जुगार खेडुन येनार्या व्यक्तीच्या कारने अपघात केल्याचा अंदाज…
वाहनासह वाहन चालक पसार…
गोंदिया ( देवरी ) : चिचगड रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या एक व्यक्तीला देवरी कडे भरधाव वेगाने येनार्या चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजता सुमारास चिचगड रोडवरील सालई – परसटोला परीसरात घडली आहे. सदर कार जुगार खेडुन येणार्या व्यक्तीची असल्याचा अंदाज नागरीकांकडुन लावल्या जात आहे.
देवरी,दि.23 ; मॉर्निंग वॉकला गेलेल्या 68 वर्षीय व्यक्तीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना चिचगड रोडवर आज (दि.23) सकाळी 6.00 वाजता सुमालास घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, देवरी पोलीसानां पाचारण करण्यात आले आहे. मंगल रामजी दहीकर राहनार देवरी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चिचगड मार्गे देवरीकडे भरधाव वेगाने येनार्या कारने मंगल दहीकर यांना मागून जोरदार धडक दिली. दहीकर व त्यांचे सहकारी हे नेहमीप्रमाणे चिचगड रोडला पहाटे मॉर्निंग वॉकला गेले होते. चिचगड रोडवरुन रस्त्याच्या कडेने येत असतानाच मागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की यात मंगल दहीकर हे हवेत उडून जमिनीवर आपटले. यात ते गंभीर जखमी होत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मॉर्णीगं वॉकला गेलेले अनेक लोकांच्या यात जिव वाचला.
विशेषता कोरची (गडचिरोली) तालुक्यात अवैध प्रमानात जंगल परीसरात जुगार भरविल्या जातो. ज्यात अनेक लोक देवरी चिचगड मार्गे कोरची जंगल परीसरात जुगार खेळायला जातात. जुगार संपला की सकाळी आपल्या वाहनानीं परत चिचगड मार्गने देवरीकडे परत येतात. त्यातीलच ही एक जुगार खेळनार्या व्यक्तीचे वाहन असल्याची चर्चा आहे. विशेषता अपघात होताच वाहनचालक वाहनासह फरार झालेला आहे. दर्शनीने वाहन अर्टीका असल्याचा अंदाज बांधला आहे. विशेषता कोरची पोलिस्टेसन अंतर्गत जंगल परीसरात छुप्या पद्धतीने सुरु असलेला हा जुगार भरविन्यावर कोरची पोलसांनी कारवाही करावी असी मागनी आता जोर धरू लागली आहे.









