मतदानाच्या दिवशी व एक दिवस आधी
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करु नये

  गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने 7 नोव्हेंबर 2024 चे पत्रान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसपूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये याबाबत दक्षता घेणेबाबत निर्देश दिले आहेत.

         कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी व मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे 19 नोव्हेंबरला प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, ज्योपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये.

        राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे (MCMC) अर्ज करावा लागेल अशा सूचना दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सदरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब