मद्यविक्री दुकाने चार दिवस बंद ।।

गोंदिया : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे व 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सदर निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या 48 तासांमध्ये मद्य विक्री करण्यास मनाई जाहीर करण्यात आली आहे, तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे.

          त्याअर्थी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा मधील कलम 142 (1), महाराष्ट्र देशी दारु नियमावली 1973 चे नियम 26 (सी) (1) व मुंबई विदेशी मद्य नियमावली 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (1) मधील तरतुदीनुसार गोंदिया जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारीत केले आहे.

         त्यानुसार 18 नोव्हेंबर 2024 रोजी अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा क्षेत्रात मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर दुपारी 3 वाजेपासून पुढे तसेच गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रात सायंकाळी 6 वाजेपासून पुढे. 19 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या पुर्वीचा संपूर्ण दिवस संपूर्ण गोंदिया जिल्हा. 20 नोव्हेंबर 2024 मतदानाचा संपूर्ण दिवस संपूर्ण गोंदिया जिल्हा. 23 नोव्हेंबर 2024 मतमोजणीचा दिवस मतमोजणी संपेपर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा मद्यविक्री अनुज्ञत्या बंद ठेवावे. सदर आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब