महायुती सरकारच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर : नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्री असण्याची शक्यता

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. राज्यातील जनता महायुती सरकारच्या शपथविधीची आतुरतेने वाट पाहत आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे

महाराष्ट्र (मुंबई) :राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने घसघशीत यश प्राप्त केली. त्यानंतर आता २ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदासाठी शपविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत चर्चा रंगली आहे. एपीबीने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक २० ते २५ मंत्रिपदं, तर शिंदेंच्या शिवसेनेला १०-१२ तर, अजित पवार गटाला ७-९ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

सध्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाली आहे, त्याची संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

गिरीश महाजन

सुधीर मुनगंटीवार 

चंद्रकांत दादा पाटील।

रविंद्र चव्हाण

मंगलप्रभात लोढा

चंद्रशेखर बावनकुळे

आशिष शेलार

नितेश राणे

शिवेंद्र सिंहराजे भोसले

राहुल कुल

माधुरी मिसाळ

संजय कुटे

राधाकृष्ण विखे पाटील

गणेश नाईक

पंकजा मुंडे

गोपीचंद पडळकर

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी

उदय सामंत

शंभूराज देसाई

गुलाबराव पाटील

संजय शिरसाट

भरत गोगावले

प्रकाश सुर्वे

प्रताप सरनाईक

तानाजी सावंत

राजेश क्षीरसागर

आशिष जैस्वाल

निलेश राणे

राष्ट्रवादी संभाव्य मंत्र्यांची यादी

अजित पवार (उपमुख्यमंत्री)

धनंजय मुंडे

छगन भुजबळ

अदिती तटकरे

अनिल पाटील

हसन मुश्रीफ

धर्मरावबाबा आत्राम

माझ्यामुळे सत्ता स्थापनेत कुठलीही अडचण नाही, मोदींना फोन, शिंदे म्हणालेभाजपचा निर्णय मान्य एकनाथ शिंदेंचा मोदींना फोन

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी शिंदे गटाची इच्छा होती. त्यासाठी भाजपवर दबावही पाडण्याचाही प्रयत्न झाला. पण, विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपने मुख्यमंत्रिपदावरील ताबा सोडला नाही. अखेर, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर मौन सोडलं. यावेळी ते म्हणाले की, सरकार स्थापन करण्यात माझी काहीही अडचण नाही, भाजपने आम्हाला साथ दिली आम्हाला अडीच वर्ष सोबत काम केलं. भाजप जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. तसेच, शिंदेंनी पंतप्रधान मोदींना फोन करुन सांगितलं की, सत्ता स्थापनेत माझी काहीही अडचण नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल. अशी माहिती विदर्भ न्यूज कडे माहिती प्राप्त झालेली आहे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें