महाविकास आघाडीचा बंडखोर मैदानात तर नवख्या उमेदवाराच टेन्शन मात्र  वाढणार, आमगाव विधानसभे मध्ये काय सुरू ?

गोंदिया ( देवरी ) : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. तोपर्यंत बंडखोरांना थंड करण्याचे काम केले जात आहे. काही ठिकाणी यश येत आहे तर काही ठिकाणी बंडखोर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. महायुती असो की महाविकास आघाडी. दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदार संघातही अशीच स्थिती आहे. इथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. हा मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेसला गेला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्याने इथे बंडखोरी केली आहे. अशा वेळी कॉंग्रेसच्या नवख्या उमेदवाराचे टेन्शन मात्र वाढले आहे.

गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव  मतदारसंघात महाविकास आघाडीचे  बंडखोर विलास चाकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीची टिकीट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला द्यावी अशी मागणी  विलास चाकाटे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.  मात्र महाविकास आघाडीने नवखा उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष असलेले विलास चाकाटे यांनी बंडखोरी केली असून महाविकास आघाडीचे पक्ष श्रेष्टी त्यांचा बंड शांत करण्याकरीता कोणता मार्ग वापरतात हे पाहने महत्वाचे ठरनार आहे.

महाविकास आखाडीत आमगाव – देवरी विधानसभा  या मतदार संघात बंडखोरी झाल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलास चाकाटे व त्यांच्या कार्यकर्त्यात राग कायम आहे. तो राग विलास चाकाटे यांनी बोलूनही दाखवला आहे. तेच चाकाटे आता निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यांनी बंडखोरी करत कॉंग्रेसच्या उमेदवारा विरोधात दंड थोपटले आहे. काँग्रेसने नवखा उमेदवार रिंगणात उतरवले आहे. अशा वेळी महाविकास आघाडीत बंडखोरीने कॉंग्रेसच्या नवख्या उमेदवाराचे टेन्शन मात्र वाढले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. बंडखोरांना थंड करण्याचे काम केले जात आहे. सतत प्रयत्न करुनही आमगाव मतदार संघात  यश येत नसल्याने बंडखोर विलास चाकाटे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आमगाव विधानसभा मतदार संघात बंडोबा थंड होणार की दंड थोपटून निवडणूक लढवण्यावर ठाम राहाणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यात    चाकाटे यांचा कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीला घेऊन टोकाचा विरोध आहे. त्यामुळे इथलं बंड शमलं नाही तर ते महाविकास आघाडीतील नवख्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा असेल अशी चर्चा मतदार संघात कायम आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें