सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासन मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक महिन्यांपासून वसतिगृहामध्ये मुलीनां नगरपंचायतच्या प्याऊ घरातुन प्यासाठी पाणी आनावे लागत आहे. वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट असल्याने तेथील विद्यार्थिनींचे हाल होत आहेत.
गोंदिया ( देवरी ) ; शहरातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासन मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक महिन्यांपासून वसतिगृहामध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने तेथील विद्यार्थिनींचे हाल होत आहेत. पुरेसे पाणी मिळावे यासाठी विद्यार्थीनीं संबधीत विभागाकडे विनंती अर्ज केले. परंतू त्या अर्जाची वरीष्टानीं अजुनही दखल घेतली नसल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये पदव्युत्तर, पदवीधर , ईतर शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनींसाठी हे वसतिगृह आहे. या वसतिगृहांमध्ये अंदाजे चाळीस पेक्षा अधिक विद्यार्थिनी राहतात. सध्या या वसतिगृहातील विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. दिवसभरातून चार पेळा होस्टेलच्या समोर असलेल्या नगरपंचायतच्या प्याऊ घरातुन प्यासाठी पाणी आनावे लागतो. होस्टेल परीसरात विहीर असली तरी विहीरीचा पाणी पिण्या योग्य नसल्याने विहीरीच्या पाण्याची घान वास येत असल्याचे विद्यार्थांचे म्हणने आहे. कधी नगरपंचातच्या पाऊला पाणी नसले की पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थिनींची चांगलीच धांदल उडते. पाणी भरून ठेवण्यासाठी विद्यार्थिनींच्या रांगा लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी बाटल्यांमध्ये पाणी साठवून ठेवावे लागते. हे पाणी चार-चार दिवस वापरावे लागते. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुरेसे पिण्याचे पाणी नसल्याने विद्यार्थिनी त्रस्त आहेत. प्रशासनाने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.
विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहांसाठी दररोज हजारो लिटर अन्य कारण्यांसाठी व पिण्याचे पाणी लागते. पिण्याचे पाणी नगरपंचायतच्या पाऊ घरातुन विद्यार्थिंनी मार्फत अजुनही वापरले जाते. सांडपाण्यासाठी वस्तीगृहाच्या परीसरात असलेल्या विहिरींतून पाणीपुरवठा केला जातो. विद्यार्थिनींना रस्ता ओलांडुन पिण्यासाठी पाणी आनावे लागते. नगरपंचायतच्या पाऊ घरात विद्यार्थिंनी गुंड्या घेऊन रांगा लागलेल्या असतात यावर वरिष्टानी लवकर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.








