कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्यावर होणार कायदेशिर कारवाई..
गोंदिया : याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी, श्री. नित्यानंद झा, यांनी मावळते वर्ष- 2024 व येणारे नवीन वर्ष- 2025 च्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील 4 उपविभाग व अंतर्गत 16 पोलीस ठाणे, 11 सशस्त्र दूरक्षेत्र परिसरात कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याचे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत…
या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखण्यासाठी खालील प्रमाणे निर्देश सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत….
1) जिल्ह्यातील संपुर्ण 16 पोलीस ठाणे स्तरावर महत्वाचे चौका-चौकात रहदारीस अडथळा होणार नाही याकरिता फिक्स पॉइंट बंदोबस्त,नाकाबंदी, कोंबींग ऑपरेशन, गस्त पेट्रोलिंगचे आयोजन करण्यात आलेले आहे..
2) मावळते वर्ष व येणारे नवीन वर्षाच्या अनुषंगाने अवैधरित्या देशी, विदेशी, हा.भ.दारू तस्करी, विक्री करणाऱ्यावर त्याचप्रमाणे जुगार खेळ खेळणाऱ्यावर पोलीसांची करडी नजर असणार आहे…..
3) हॉटेल, लॉजेस, धाबे, रेस्टॉरंट यामध्ये आयोजित सेलिब्रेशन पार्ट्यांवर तसेच धांगडधिंगा करणाऱ्यावर पोलीसांची नजर राहणार आहे….
4) आयोजित सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये मोठ- मोठ्या कर्न-कर्कश्य आवाजात डी.जे. वाजवणे, जोरा- जोराने लाऊड स्पीकरवर गाणी वाजविणे अशा प्रकारची कायद्याची उल्लंघन करणारी कृती करणे, ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे….
5) कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमावर कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे..
6) *ड्रंक अँड ड्राईव्ह चे विशेष* मोहिम अंतर्गत अंमली पदार्थ, दारूचे सेवन करून वाहन चालविणाऱ्यावर प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.
7) हेल्मेट परिधान न करणाऱ्या तसेच मॉडिफाइड वाहन सायलेन्सर असणाऱ्या व जोराने आवाज करणाऱ्या वाहनावर मोटार वाहन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.. ….
8) स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या 4 पथकाद्वारे जिल्ह्यातील गोंदिया शहर , गोंदिया ग्रामीण, रामनगर, रावणवाडी, तिरोडा, आमगाव, गोरेगाव, डूग्गीपार परिसरात गस्त पेट्रोलिंग दरम्यान अवैध व्यवसाय करणारे, अवैध कृती करणारे, रेकॉर्ड वरील गुन्हेगार, गुन्हेगार प्रवृत्तीचे ईसंम, उपद्रवी ईसमांवर कारवाई करण्यात येणार आहे…..
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व जनतेला, नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, संपुर्ण जनतेनी जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात, आपसी सामंजस्य ठेवून, सौहार्द पूर्ण वातावरणात मावळणारे वर्ष व येणारे नवंवर्षाचे सेलिब्रेशन करून स्वागत करण्याचे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे…..
*…..पोलीस बंदोबस्त…..*
पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया, आमगाव, देवरी, तिरोडा यांचे सम्पूर्ण देखरेखीखाली जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता गोंदिया जिल्ह्यातील 4 उपविभाग 16 पोलीस ठाणे स्तरावर, कार्यालयीन स्तरावर- 65 अधिकारी-750 पोलीस अंमलदार असा चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे…उपविभाग गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी अंतर्गत स्तरावर प्रत्येकी 1 अधिकारी 10 पोलीस अंमलदार यांचे स्ट्राइकिंग फोर्स, 10 पोलीस अंमलदार, यांचे रिझर्व फोर्स तर प्रत्येक ठाणे स्तरावर महत्वाचे चौका चौकात तसेच वर्दळीच्या व गर्दीच्या ठिकाणी पॉईंट, व गस्त पेट्रोलिंग बंदोबस्त, नाकाबंदी चे आयोजन, त्याचप्रमाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार, उपद्रवी ईसम, कायद्याचे उल्लंघन करणारे यांच्यावर कारवाई करणारे वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली आहेत… त्याचप्रमाणे गोंदिया शहर, रामनगर परिसरात महीला, मुले, बालके, यांचे सुरक्षेकरीता दामिनी पथक, चार्ली पथक, क्यू.आर. टी. पथक, बी.डी.डी.एस, गस्ती पथके, स्वान पथक, बिनतारी संदेश यंत्रणा सक्षम करण्यात आलेली असून संपूर्ण जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे..
