रसत्यावरील झाड ओमनी कारवर पडला : दोघांचा जागीच मृत्यु तर ईनोवातील प्रवासी थोडक्यात बचावले

सडक अर्जुनीच्या SBI बँकेसमोरील घटना…गोंदिया – सडक अर्जुनी मार्गाची वाहतुक ठप….

गोंदिया ( सड़क अर्जुनी ) : जिल्ह्याभर पावसाने कहर केला असुन संपुर्ण जमीन ओली होत भुसभुसीत झाली आहे. ज्यामुळे रसत्याच्या काठावर असलेली मोठ – मोठी झाठे खाली कोसळुन अपघात होत आहेत. असीच घटना गेंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी शहरात घडली असुन रसत्यानी जात असलेल्या ओमनी कारवर झाड पडल्याने स्थानीक सडक अर्जुनी येथील दोन व्यक्तींचा झाडाखाली दबुन जागीच मृत्यु झाला आहे.
गोंदिया मार्गे सडक अर्जुनी शहरातील SBI बँकेसमोर रसत्याच्या काठेवर असलेला झाड समोरुन येत असलेल्या ओमनी कार वर पडल्याने सडकअर्जुनी येथील स्थानीक रहीवासी असलेले वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत यांचा झाडाखाली दबुन जागीच मृत्यु झाला आहे. तर  त्याच मार्गाने मागुन येनार्या ईनोवा कारचा संतुलन बिघडल्या ईनोवा कार झाडाला आदळत त्या ईनोवा कार मधील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. अपघात होताच स्थानीकानीं बचाव कार्य सुरु केले पंरतु झाड येवढे भव्य होते की त्या ओमनी कारमधील दोन्ही व्यक्तीचां जागीच मृत्यु झाला. सदर घटना आज सकाळी 9.00 वाजता दरम्यानची असुन सडक अर्जुनी शहरातील मुख्य मार्गावर असलेली मोठी व जुनी झाडे कापन्याची मागनी नागरीकांनी संबधीत विभागाला केली आहे. सदर घटना घडताच गोंदिया – सडक अर्जुनी मार्गावरील वाहतुक ठप झाली होती.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें