गोंदिया ( सडक अर्जुनी ) : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या खोबा येथील रस्ता अपघातात बिबट्याचा जागेच मृत्यू झालाची घटना आज ता 29 जानेवारी ला सायंकाळी 7.30 वाजता घडली आहे .
कोहमारा नवेगाव बांध मार्गातील खोबा गावाजवळ रस्ता क्रॉस करत असताना बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला बिबट्या माती जातीच्या असून दोन वर्षाच्या असल्याची माहिती रतन दर्शनी मिळालेआहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे , क्षेत्र सहाय्यक संजय पटले ,वनरक्षक प्रदीप हत्तीमारे , मुकेश चव्हाण ,पुरुषोत्तम पटले , इंदू राऊत, वनमजुर रमेश मेश्राम ,वाहन चालक समीर बनसोड यांच्या मदतीने त्या मृत बिबट्याला कोहमारा वनक्षेत्रात आणण्यात आले. पुढील तपास वन अधिकारी करीत आहेत.
