रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत शिरपुर/बांध सिमा तपासनी नाक्यावर रक्तदान शिबिर

देवरी  : 36 व्या रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया तर्फे देवरी सिमाशुल्क तपीसनी नाका शिरपुर बांध येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात शेकडो जणांनी रक्तदान केले.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी मोटार वाहन परिवहन निरीक्षक  रविन्द्रं राठोड व  विनय गांगुरडे उपस्तीत होते.  गोंदिया शासकीय वैद्यकिय व गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे डॉ. विनय मिरयानीं , विजय बिसेन, चेतन गायनेर, गणेश हुळे , पायल ईरपुळे, मोहिनी नागरीकर , अजय जाधव , सुधिर सांडीले , ईश्वर चुटे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना परिवहन अधिकारी राठोड  म्हणाले, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान केल्याने इतरांचा जीव वाचविण्यास मदत होत असते. तर आपले जीवनही सुरळीत राहत असते. त्यामुळे रक्तदान करत राहावे, असे आवाहन केले. यावेळी शेकडो जणांनी रक्तदान केले. यावेळी सिमाशुल्क तपासनी नाका देवरीचे कर्मचारी व  उपप्रादेशिक परिवनह कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

आयोजीत रक्तदान शिबीर यशस्वी करन्याकरीता  राजेश ठाकरे वरिष्ट लिपीक , निलेश शिवनकर , गणेश गाते, गजानन शिवनकर , दुर्योधन शिवनकर , गौरव शर्मा , जितेन्द्रं कटोरे, संदिप सिंग यानीं अथक परिश्रम घेतला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें