मुंबई : निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सुरू झालेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत सुमारे २.३५ कोटी महिलांना लाभ मिळत आहे. मात्र. यातील केवळ १.३ कोटी महिलांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित जवळपास एक कोटी महिलांचे ई-केवायसी बाकी आहे. या महिलांसाठी ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधी १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. आता त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी त्यांच्या समाज माध्यमांवरून या निर्णयाची माहिती दिली. राज्यातील काही भागात पुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई केवायसी करता आले नव्हते








