उन्हाळा सुरू होताच गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. काही ठिकाणी निसर्गत:च तर काही ठिकाणी नियोजनाच्या अभावाने पाणीटंचाई सुरू आहे.
देवरी : उन्हाळा सुरू होताच गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. काही ठिकाणी निसर्गत:च तर काही ठिकाणी नियोजनाच्या अभावाने पाणीटंचाई सुरू आहे. अशीच टंचाई सध्या देवरी तालुक्यातील लेडींजोब गावात सुरु आहे. सोबतच हिच समस्या देवरी तालुक्यातील अनेक गावात सुरू आहे. नदीला पाणी आहे, धरणात पाणी आहे, पण पाणी योजना जीर्ण झाली आणि त्यावर पैसा खर्ची टाकायचा नाही या शासनाच्या धोरणामुळे लेंडीजोब ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. सतत उन्हाची तीव्रता वाढत असून नद्या, नाले आटू लागले आहेत. देवरी तालुक्यात मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. शिरपुर धरणातून तालुक्यातील देवरी शहरासह अनेक गावात (मनोहर सागर) पिण्याचे पाणी मिळते. तालुक्याच्या ग्रामपंचायत स्तरावरील जल जिवन मिशन योजना अपुरी असल्याने अनेक गावची पाणीपुरवठा योजना रखडली आहे. वेळोवेळी ग्रामस्था कडुन मागणी करून देखील संबधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने भर उन्हाळ्यात ग्रामस्थांच्या समोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लेंडीजोब गावात सुमारे १५०० लोकवस्ती आहे. लेंडीजोब ग्रामस्थ पावसाळ्यात गावात असलेल्या हातपंपाचे पाणी वापरतात. विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापर करतात. पण या हातपंप व विहिरींना देखील आता पाणी पुरेसे नसल्याने मार्च महिन्यातच पाण्याची बोंबा -बोंब लेंडिजोब गावात सुरू झाली आहे.मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरी व हातपंपाचा पाणी खोल गेल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जलजिवन मिशन या योजने द्वारे गावात पाणीपुरवठा लवकर करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तर दुसरीकडे लाखे रुये खर्च करीत उभे केलेले ” जल जिवन मिशन” योजना फक्त पांढरे हत्ती ठरत आरे. ज्यामुळे लेंडीजोब वाशीयानां पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावतो आहे.
लेंडीजोब गावात असलेल्या मोजके हातपंप व विहीरी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच आटल्याने पाण्याच्या शोधात ग्राम वाशीयानां मोठ्या प्रमाणात श्रम आणि वेळ वाया जातो आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात लेडींजोब गावातील पाणीटंचाई पाहता गावात टँकरनी पाणी पुरविले गेले होते. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाण्याची टंचाई होत असल्याने एप्रिल, मे महिन्यात काय स्थिती राहील यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तेव्हा योग्य ते नियोजन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
प्रतिक्रीया …
लेडींजोब गावातील नागरीकानां पाण्याची समस्या दर वर्षी उन्हाळ्यात होते. या वर्षी गावातील नागरीकानां पाण्याची समस्या व्हायला नको म्हणुन संबधीत विभागाला पंचायत समिती स्तरावरुन पर्यायी व्यवस्ता करुन देण्याकरीता विनंती करन्यात आली आहे.
श्रीमती. समिता कटरे (सरपंच, लेडींजोब-कन्हाळगाव)
प्रतिक्रीया…
देवरी तालुक्यातील संपुर्ण ग्रामपंचायतच्या समस्यांचा आढावा घेन्यात आलेला आहे. उन्हाळ्यात नागरकांना होणार्या पाण्याच्या समस्यांचा प्रस्थाव पाठविन्यात आलेला आहे. त्यावर लवकर तोडगा निघेल व सगळ्या ग्रामपंचायत मधिल नागरीकांची पाण्याची सुटनार आहे.
अनिल बिसेन ( सभापती पं.स.देवरी)









