गोंदिया ( गोठणगांव ) : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा. यांचे संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक पाटील सा, पोलिस स्टेशन केशोरी चे ठाणेदार श्री. मंगेश काळे सा. यांचे मार्गदर्शनाखाली व लॉयन क्लब ऑफ नागपूर व्हिजन चे प्रेसिडेंट श्री रत्नाकर चिमोटे, सेक्रेटरी श्री सुनील कुंभे, डिस्ट्रिक्ट को- ऑर्डिनेटर अवनीकांत वर्मा, ट्रेझरर श्री जयदेव कांबळी तसेच माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर चे अध्यक्ष सुहास खरे यांच्या आर्थिक सहाय्याने व प्रयत्नाने आज सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगाव अंतर्गत बोंडगाव/सूर या गावातील गावकऱ्यांमार्फत नवीन सुरु करण्यात आलेल्या कॉन्व्हेन्ट स्कूल च्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस/ ट्रॅक सूट तसेच चॉकलेट, बिस्कीट व लहान मुलांना खेळण्यासाठी भेटवस्तू इत्यादी वाटप करण्यात आले. 3 ते 5 वर्ष वयोगट असलेल्या ऐकूण 22 विद्यार्थ्यांना सदर साहित्य वाटप करण्यात आले, सदर चा कार्यक्रम श्री मंगेश काळे ठाणेदार पोलिस स्टेशन किशोरी यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस मदत केंद्र गोठणगाव चे प्रभारी अधिकारी पोउपनि निळकंठ गित्ते यांच्या पुढाकाराने तसेच हवलदार मिसार, मडावी, थेर यांच्या मदतीने पार पडला, सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच
पोलिस पाटील ग्रामसेवक… तलाठी… शाळेचे शिक्षक…
गावातील 70 ते 80 प्रतिष्ठित नागरिक इत्यादी आवर्जून उपस्थित होते.









