वरवरच्या उपाययोजनांनी अपघात थांबणार नाहीत…
देवरी शहरात उड्डाणपुलाची गरज…

‘ राष्ट्रीय महामार्ग ’ आणखी किती बळी घेणार?



गोंदिया ( देवरी )  ; पूर्वी वनवे असलेल्या नागपुर – रायपुर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणानंतर महामार्गावरील अपघात कमी होतील अशी अपेक्षा होती, मात्र चौपदरीकरण झाले तरी देवरी हद्दीतील महामार्गावर अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॉट) कायम आहेत. त्यातील सर्वाधिक गंभीर अपघात होणारा ‘ब्लॅकस्पॉट’ हा देवरी घाट परिसर आहे. गेल्या दोन वर्षात या ब्लॅकस्पॉटवर झालेल्या अपघातात दहाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अपघातानंतर सातत्याने तक्रारी होवूनही महामार्ग प्राधिकरण मात्र सुस्त असल्याचे दिसते. या ब्लॅकस्पॉटवरील उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उड्डान पुल तयार झाल्यानतंर चालकांनी मोकळा स्वास घेतला असला तरी मुख्य अपघात स्थळ आता देवरी शहरातुन गेलेला महामार्ग बनलेला आहे. देवरी शहरातुन गेलेल्या महामार्गवार लवकरात लवकर  ठोस उपाययोजना न झाल्यास जीवघेण्या अपघातांची श्रुंखला वाढण्याची भीती कायम आहे. तर दुसरीकडे शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उडाण पुलाची मागणी जोर धरु लागली आहे.

महामार्ग चौपदरीकरण करताना अनेक वळणे काढण्यात आली. बराचसा भाग हा सुरक्षित झाला. परंतु, काही ठिकाणी तांत्रिक बाबींचा विचार न करता महामार्गाचे काम तसेच रेटण्यात आले. ज्यात देवरी शहरातील उडाणपुल आहे , त्यामुळे देवरी शहरापासून देवरी घाटपर्यंत काही ठिकाणी अपघात प्रवणक्षेत्रे अर्थात ब्लॅकस्पॉट तयार झाले आहेत. यामध्ये देवरी हरातुन गेलेल्या मुख्य आमगाव चौक व राणी दुर्गावती चौक हे कुविख्यात ‘ब्लॅकस्पॉट’ आहे. महामार्ग चौपदरीकरण पूर्णत्वास आल्यानंतर गेल्या ऐक वर्षात या देवरी घाटापर्यंत जवळपास लहान मोठे 20 हून अधिक अपघात झाले. या अपघातात आजवर दहाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अपघातांची ही मालिका सुरुच असून येथे दर आठवड्याला किमान एकतरी लहान मोठा अपघात होतोच.

देवरी शहर हा जिल्ह्याच्या टोकावरील शेवटचा तालुका असल्याने तालुक्याच्या शिरपुर गावाला लागुनच सिमा शुल्क तपासनी नाका आहे. त्यातच देवरी शहरातील मुख्य भागातुन महामार्ग गेला असल्याने सतत  मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर थोडी जरी वाहतूक थांबली. तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या जातात. विशेषता रस्ता ओलांडला की अनेक विद्यालये शाळा , गावे आहेत . विद्यार्थानां रस्ता ओलांडुन जातानां चांगलीच कसरत करावी लागते. तर सतत होत असलेल्या अपघातामुळे महामार्ग ओलांडताना विद्यार्थी व नागरीकांच्या मनात सतत भीतीचे वातावरन निर्मान असते. आता विद्यार्थी व नागरीक स्वत: उडानपुलाच्या मागनी करीता रसत्यावर येन्याची तयारी दाखवनार असल्याचीही चर्चा देवरी शहरात चागलीच जोर धरु लागली आहे. देवरी शहरातुन गेलेला महामार्ग अनेक वर्षापर्वी मंजुर झाला होता. परंतु याच महामार्गाला लागुन असलेल्या हॉटेलस, व ईतर व्यापारी यानीं स्वत:च्या फायद्यासाठी पॉलिटीक्स दबाव आनत अनेक वर्षापासुन मंजुर असलेल्या देवरी शहरातील उड्डान पुलाचे बांधकाम थांबविले असल्याची चर्चा अख्या देवरी शहरात सतत सुरू आहे. ज्याचा परिनाम विद्यार्थानां व नागरीकांना आपला जिव गमावुन द्यावा लागनार आहे. यावर शासन प्रशासनाने योग्य तो निर्णय घेत लवकरच उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरूवात करन्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रीया…

   देवरी शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसले असुन तालुक्याचा भाग आहे. अनेक गावे देवरी शहराला जुळले आहे व  मोठी बाजारपेठ ही देवरी शहरातच आहे. हजारो ग्रामीन भागातील लोकांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडुनच देवरी शहरात यावे लागते. कार्यालयीन कामे व खेरदी करीता शहरात यावे लागते. सोबतच अनेक शाळा व कॉलेजला महामार्ग ओलांडुनच विद्यार्थानां जिव मुठित ठेऊन जावा लागीत असल्याने सामान्य नागरीक व विद्यार्थांच्या जिवाला मोठा धोका आहे. यावर नवनिर्वाचीत आमदार यानीं लक्ष देत देवरी शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उडानपुल बनवण्यासाठी जोमाने प्रयत्न करायला पाहीजे.

रमेश ताराम – आमगाव – देवरी विधानसभा अध्यक्ष राकाँपा

प्रतिक्रीया…

   आमच्या शाळेत देवरी शहरासह तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यास येतात. पण देवरी शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उडाण पुल नसल्याने महामार्ग ओलांडतानी विद्यार्थांना जिव मुठित घेऊनच रस्ता ओलांडावा लागतो. यावर स्थानिक जनप्रतिनीधी व संबधीत विभागाने देवरी शहरातुन गेलेल्या महामार्गावरील उड्डाण पुलाच्या महत्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहीजे.

प्रा.सुजित टेटे – मुख्याध्यापक ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें