वांढरा गट ग्रामंपचायत ; अखेर गटविकास अधिकार्यांनी दिले चौकशीचे आदेश

गावकऱ्यांनी दिली कंत्राटदार व ग्रामसेवक यांच्या विरोधात लेखी तक्रार…

देवरी ( चीचगढ़ )  :  देवरी पंचायत समीती कार्यालया अंतर्गत येत असलेल्या वांढरा गट ग्रामंपचायत येथे सुरु असलेल्या शौचालय बांधकामाच्या चौकशीचे आदेस अखेर देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सिंगनजुडे यानीं दिले आहे. वांढरा गावातील नागरीकांनी शौचालयाच्या तक्रारी सोबत ग्रांमपचायत हद्दीत व ग्रामंपचायतला आलेल्या विविध योजनांच्या निकृष्ट पद्धतीने केलेल्या  बांधकाम, विकास कामे व गैरव्यवहार  सोबतच “जल जिवन मिशन योजना” या कामाची चौकशी व वांढरा ग्रामपंचायतचे सचिव सतत गैर हजर राहत असल्याची तक्रार लेखी स्वरुपात गावातील नागरीकांनी गटविकास अधिकारी देवरी व मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना निवेदना द्वारे दिली आहे.

दिलेल्या तक्रारीत वांढरा ग्रामपंचायतला  करोडो रुपयाचा निधी मंजुर होत निकृष्ट बांधकाम करत संबधीत कंत्राटदार व वांढरा ग्रामपंचायतला कार्यरत असलेले ग्रामसेवक यानीं अनेक कामे न करता व निकृष्ट दर्जाची कामे करत लाखो रुपयांच्या बिलाची उचल संगनमत करुन केली असुन शासनाच्या निधीची अफरातफर करत शासनाची दिसाभुल केला असल्याचा उल्लेख दिलेल्या तक्रार अर्जात ग्रामस्थानीं  केला आहे. ज्यात  जिल्हापरिषद अंतर्गत मंजुर झालेला व आता बांधकाम सुरु असलेल्या शौचालय ज्याचे काम ईस्टीमेट नुसार होत नसुन काम निकृष्ट असल्याचा पुरावा त्या शौचालयाचे स्लॅप कोसळताच वांढरा गावातील नागरीकांनी प्रशासनाच्या निदर्षनात आनुन दिला आहे. विशेषता हे काम स्वत: वांढरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जवळच्या व्यक्तीला कंत्राट देत रोजनदारीचे मानसे लावत काम करुन घेत असल्याचाही उल्लेख वांढरा गावातील नागरीकांनी तक्रार अर्जात केला आहे.

वांढरा ग्रामपंचायत ही ऐक गट ग्रामंपचायत आहे. गावात हजारो नागरीक वास्तव्यास आहेत. ग्रामस्थांच्या मुलाबाळानां शाळेकरीता व ग्रामस्तानां शासनाच्या विविध योजना घेन्याकरीता ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्या दाखल्यांची गरज पडते  पण ग्रामंपचायतचे ग्रामसेवक सतत दोन – दोन आठवडे कधी महिनाभर गैर हजर राहत असल्याने विद्यार्थांची व वांढरा गावातील ग्रामस्थांची चांगलीच गैर सोय होत विद्यार्थांचा व ग्रामस्थांचा शैक्षनीक व शासनाच्या योजनांचा नुकसान झाला असुन अजुनही नुकसान होत असल्याची लेखी तक्रार वांढरा गावातील नागरीकांनी गटविकास अधिकारी देवरी व मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्या कडे केली आहे. ग्रामस्थानीं तक्रार अर्जाद्वारे संबधीतावर चौकशी बसवावी व दोषी अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाही करत शासनाच्या निधीची वसुली करुन घ्यावी. व वांढरा ग्रांमपचायताला कायम स्वरुपी ग्रामसेवक द्यावे. अन्यथा आपल्या कार्यालया समोर उपोषनाला बसनार असल्याचाही उल्लेख तक्रार अर्जात वांढरा गावातिल ग्रामस्थांनी केला आहे. ज्यावर खंडविकास अधिकारी यांनी तक्रार अर्जात दिलेल्या विषयांच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
 
प्रतिक्रीया….

वांढरा गावात सुरु असलेल्या शौचालय बांधकामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. व तक्रार अर्जात वांढरा गावातील दिलेल्या इतर तक्रारीचीही चौकशी करन्यात येईल. व सबंधित कंत्राट दार व ग्रामपंचायतचे सचिव दोषी आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करन्यात येईल.

        जी. टी. सिंगनजुडे (गट विकास अधिकारी पं.स.कार्यालय देवरी)

प्रतिक्रीया…
  

दि. 03 फेब्रुवारीला वांढरा गावात चौकशी करीता संबधित अधिकारी व कर्मचारी पाठविन्यात आले होते. पाठीविलेले अधिकारी चौकशीचा अहवाल दिल्यास व त्यात ते दोषी आढळल्यास त्यांवर कारवाही करन्यात येईल.

अनिल बिसेन (सभापती पं.स.कार्यालय देवरी)

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें