करोडो खर्च करूनही पाण्याचा एक थेंब नाही,
वांढरा मध्ये जल जीवन मिशनची योजना फसली!

देवरी ( चिचगढ़ ) : ताुक्यतील वांढरा गट ग्रामंपचायत येथे ‘जल जीवन मिशन योजना भ्रष्टाचाराची शिकार’ झाली आहे. असे म्हटले तर बहुधा चुकीचे ठरणार नाही. संबधीत अधिकारी आणि ठेकेदारांच्या मिलीभगतमुळे शासनाची ही महत्त्वाची योजना वांढरा गावात फोल ठरल्याचे दिसून येत आहे. जल जीवन मिशन ही मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे, जी मार्च 2024 पर्यंत पूर्ण करने होती. या योजने अंतर्गत गावातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेवर कोटय़वधी रुपये पाण्यासारखे खर्च केले गेले. मात्र देवरी तालुक्याच्या वांढरा गावात सरकारची जल जीवन मिशन योजना भ्रष्टाचाराची शिकार बनली? आहे.
निकृष्ट बांधकाम, अपूर्ण बांधकाम आणि कंत्राटदारांना लाखो रुपयांची देयके असा मोठा खेळ गट ग्रामंपचायत येथे झाल्याचा आरोप वांढरा गावतील जानकार नागरीक करीत आहेत. वांढरा गावातील जल जीवन मिशन योजना ही केवळ कागदावरच यशोगाथा रचत आहे. तर वास्तव नेमके उलटे आहे. जिल्ह्यातील दुर्गम वनक्षेत्र व नक्षलग्रस्त क्षेत्रातील वांढरा ग्रामपंचायतींमध्ये योजनेची अवस्था बिकट आहे. या गावात पाण्याचा एक थेंबही येत नाही घराबाहेर मोकळी नळे ठेवली आहे. मात्र पाण्याचा एक थेंबही येत नाही. लाभ देत नसलेल्या अशा जल जीवन मिशन योजनेचा अर्थ काय? हा वाढंरा गावातील नागरीकांचा प्रश्न आहे.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी संबधीत विभागाने नळ जोडणीसाठी पाईप आणि प्लॅटफॉर्मचे काम केले? तरी पुरवठा लाइन टाकण्यात आलेली नाही. बांधकामास दोन वर्षे होऊनही गावातील ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने गावातील ग्रामस्थ चिंतेत आहेत. ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी व विल्हेवाटीसाठी जुन्या स्त्रोतांवर अजुनही अवलंबून आहेत, अपूर्ण कामाकडे विभागीय अधिकारी लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जल जीवन अभियानांतर्गत
लोकांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचत नसून, त्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर नळाच्या चौक्या बसविण्यात आल्या आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक ग्रामीण कुटुंबे बैल आणि बकऱ्यांना बांधण्यासाठी बसवलेल्या नळाच्या चौक्यांवर त्याचा वापर करत आहेत.
अपूर्ण कामांमध्ये ठेकेदाराने काढली रक्कम ?
वांढरा ग्रामंपचायतीमध्ये जलजीवन अभियानाचे काम अर्धे अपूर्ण असतानाही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने रक्कम काढल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत वांढरा येथील गवडीटोला येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामस्थांच्या घरापर्यंत आणि रस्त्याच्या कडेला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत क्षेत्रातील सर्व वाड्यांमध्ये स्टॅम्प पोस्ट लावण्यात आले होते, मात्र गावात पाणीपुरवठ्याची पाइपलाइन वाढवण्यात आलेली नाही. वांढरा ग्रामंपचायत हद्दीतील कवडीटोला या ठिकाणी टाकीचे बांधकाम निकृष्ट असुन काही ठिकाणी पाईपलाईनचे विस्तारीकरण न झाल्याने काम अपूर्ण असुन काम पुर्ण झाल्याची फलके लावन्यात आली आहेत. ज्यामुळे वांढरा गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या पदाधीकारी व अधिकारी यांच्या कार्यप्रनालीवर प्रश्न चिन्ह निर्माण केला जात आहे.
वांढरा येथील जल जीवन अभियानांतर्गत झालेल्या कामांचा दर्जा तपासणे आवश्यक…
जलजीवन अभियानात वांढरा ग्रामपंचायत हद्दीत झालेला निकृष्ट बांधकामाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग यांच्याकडे वांढरा ग्रामंपचायतच्या जल जीवन अभियानाच्या यशाचे कागदी आकडे आहेत, पण वास्तवात काहीच नाही. विशेषता वांढरा ग्रांपचायत विभागाचे अधिकारी व ठेकेदार ही योजना केवळ कागदावरच राबवत आहेत. जल जीवन अभियानांतर्गत झालेल्या निकृष्ट कामाच्या तक्रारी ग्रामस्थ करतात. ज्यामुळे वांढरा येथील जल जीवन अभियानांतर्गत झालेल्या कामांचा दर्जा तपासणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावी…
जल जीवन अभियानातील वांढरा ग्रांमपचायत येथे निकृष्ट दर्जाचे झलेले काम गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावी. जिल्हाधिकारी यांनी वांढरा ग्रामंपचायतला भेट देऊन जल जिवन मिशन या योजनेच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा. कामाच्या ठिकाणी बांधकामाचा दर्जा आणि कामात झालेली दिरंगाई करनार्यावर कायदेशीर कारवाही करावी व त्याची संबधीत अधिकारी व कंत्राट दार याच्या कडुन भरपाई करत त्यांना काळ्या यादीत टाकावे.
