वाघाला घेराव घालून त्याच्यासोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार

वनविभाग ॲक्शन मोडवर, नागरिकांवर कारवाईचा बडगा…

भंडारा : BT-10 या वाघिणीचा 19 वर्षीय बछडा आईपासून दुरावलेला असून हा वाघ स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी नवीन जंगलाच्या शोधासाठी भटकंती करीत आहे. अशात अड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतूर्ली गावालगत वाघानं शिकार केल्यानंतर सुस्तावलेला वाघ झुडपात बसला होता. यावेळी शेकडोंच्या संख्येत ग्रामस्थांनी त्याला अक्षरश: घेराव घालून त्याच्यासोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. ज्यामुळे आता वन विभाग ॲक्शन मोडवर आलं आहे.

वाघासोबत स्वतःच्याही जीवाला नागरिकांच्या या उपद्रव्यमूल्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी वाघाला त्रास दिल्यास त्यांच्यावर वन अधिनियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा वन विभागानं दिला आहे. जनावरांची झालेली शिकार, वाघ आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी या 19 महिन्याच्या वाघाला जेरबंद करण्याच्या दृष्टीनं एक कमिटी गठीत करण्यात आली असून त्याला जेरबंद करून प्राणी संग्रहालयात सोडण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडं सादर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या उपद्रव्य मूल्यामुळेचं आता जंगलात मुक्तसंचार करण्याऐवजी 19 महिन्याच्या वाघाच्या बछड्याला जेरबंद व्हावं लागत असल्यानं वन्यप्रेणींमध्ये नाराजी बघायला मिळतं आहे. तर वाघाला त्रास देणाऱ्या नागरिकांवर वन्यजीव अधिनियमानुसार कडक कारवाई होणार असल्याची माहिती  भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली आहे.

अगदी दहा फूट अंतरावरून वाघाला डीवचण्याचा प्रयत्न…

भंडारा वन विभागाच्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतुर्ली गावाजवळ मागील काही दिवसांपासून वाघाचं वास्तव्य आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असून आता हा समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाल्यानं समोर आला आहे. घटनेच्या दिवशी या वाघानं दोन पाळीव जनावरांची शिकार करून त्यांच्यावर ताव मारल्यानंतर तो एका झुडुपात दडून बसला होता. दरम्यान, याची माहिती मिळताच बघता बघता शेकडो ग्रामस्थ वाघ असलेल्या परिसरात पोहोचलेत. वाघ निस्तेज असल्याचं बघून अनेकांनी अगदी दहा फूट अंतरावरून त्याला डीवचण्याचा प्रकार केला.

नवेगाव-नागझिऱ्यातील NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म…

नवेगाव-नागझिऱ्यात गेल्या काळात अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अनुभवला असताना आता वन्यजीव प्रेमींसाठी नागझिऱ्यातून खुशखबर आली आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिले असून आपल्या आईसह रानगव्याच्या शिकारीनंतरचा फोटो ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश आले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें