चौकशीकरून संबंधितांवर कारवाईची गावकर्यांची मागणी…

देवरी ; तालुक्यातील वांढरा गट ग्रामंपचायत येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असतानाच त्या शौचालयाचे स्लॅप कोसळल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत चौकशीकरून संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतचे ग्रामसेवकच संबधीत कंत्राटदाराला हाती घेत निकृष्ट बांधकाम करीत शासनाचा पैसा लुटन्याच्या नादात शासनाच्या निधिचा गैर वापर करीत असल्याचे आरोप वाढंरा गावातील नागरीक करीत आहेत.
शासनस्तरावरून विविध योजना राबवून ग्रामंपचायत स्तरावर करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो, मात्र या निधीला चुना लावण्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील वाढंरा गट ग्रामंपचायत येथे समोर आला आहे. वांढरा ग्रामपंचायत येथे जिल्हापरिषदच्या वतीने अंगनवाडी परीसरात 300000 ,(तिन लक्ष) रुपये मंजुर करत शौचालयांचे बांधकाम सुरु करण्यात आले. पण हे बांधकाम ईस्टीमेट नुसार होत नसुन बांधकाम सुरू असतानींच स्लॅप कोसळल्याने या बांधकामादरम्यान निकृष्टसाहित्य वापरल्याचा आरोप होत आहे. बांधकाम साहित्य निकृष्टदर्जाचे वापरून शासनाच्या निधीला हरताळ फासण्याचा प्रकार वाढंरा गट ग्रामपंचायत येथे दिसून येत आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशीकरून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी गावातील नागरीक करीत आहेत.
विशेषता सदर बांधकाम वांढरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवकच दुसर्याच्या नावाने कंत्राट घेत स्वता करीत असल्याचे गावातील नागरीकांचे म्हणने आहे. या अगोदरही करोडो रुपयांच्या बांधकामात वांढरा गट ग्रामंपचातचे ग्रामशेवक यांनी प्रशासनाची दिसाभुल करत संबधीत कंत्राट दाराच्या नावाने काम करीत लाखो रुपयांची कामे करत पैस्याची उचल केल्याचे गावतील नागरीकांनी सांगीतले आहे. वाढंरा गावातील नागरीकांनी निकृष्ट झालेल्या व स्लॅप कोसळलेल्या त्या शौचालयाच्या बांधकामासोबतच ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या करोडो रुपयांच्या जल जिवन मिसन व संपुर्ण विकाश कामांच्या बांधकामाची चौकशी करुन संबधीत ग्रामसेवक व संबधीत कंत्राटदार यावर कायदेशीर कारवाही करन्याची मागणी आता वांढरा गावात जोर धरु लागली आहे.
प्रतिक्रीया…
वांढरा गावात अंगनवाडी परिसरात तिन लक्ष रुपयाची निधी शौचालय बांधकामाकरीता मंजुर झाली. तसे त्या ठिकानी कामही सुरू करन्यात आले. पण स्लॅप टाकताच त्या शौचालयाचे स्लॅप कोसळले. ज्यामुळे संबधीत कंत्राट दाराकुन काम करवुन घेत असलेले ग्रामसेवक व संबधीत कंत्राटदार यांचे बिंग फुटले. संबधित विभागाच्या वरीष्टानीं या कामाची तात्काळ चौकशी करीत या दोषी वर कायदेशीर कारवाही करावी व या अगोदरही वांढरा ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या करोडो रुपयाच्या कामाची चौकशी करन्यात यावी. ज्यात अशी लाखो रुपयाची कामे आहेत. जि पुर्णत्वात आली नसुनही त्या कामाची संपुर्ण निधीची उचल वांढरा ग्रामपंंचायतच्या ग्रामसेवकांच्या मेहरबानीने करन्यात आली आहे.
योगेश देशमुख (तंटामुक्ती अध्यक्ष वांढरा)
प्रतिक्रीया…
वांढरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे दुसर्याच्या नावाने काम घेत ते स्वता जवळील कंत्राट दाराशी मिळुन निकृष्ट दर्जाचे बांधकाम करतात व लाखो रुपयाच्या शासनाच्या निधिचा गैर वापर करत पैस्याची अफरातफर करतात. वाढंरा ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या संपुर्ण विकास कामाची संबधित विभागाच्या अधिकार्यानीं सखोल चौकशी करुन दोषीवर योग्य ती कारवाई करावी.
प्रवचन राऊत (गावकरी)
प्रतिक्रीया…
अंगनवाडी परिसरात होत असलेल्या शौचालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असुन हे काम ग्रामसेवकच रोजंदारीचे मानसे लावुन करतात. व असाच प्रकारे शौचालयाचे काम करीत होते. पण निकृष्ट साहित्य वापर केला व त्या शौचालयाचे स्लॅप कोसळ्याने त्यांचे बिंग फुटले. ज्यामुळे ते आमच्या गावातील नागरीकांना हे समंजुन आहे. तरी संबधीत ठिकानी जिल्हास्तरीय चौकशी लावत या कामातील दोशीवर कारवाही करावी.
दुर्योधन दयाराम भोगारे (गावकरी)
