बंडखोरीच्या नव्या पॅटर्नमुळे आमगाव मतदार संघात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’, महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विलास चाकाटे विलास भोगारेच्या समर्थनात जानार का..?
गोंदिया ( देवरी ) : राजकीय निर्णयाला योग्य ठरविण्यासाठी पक्षाविरोधात जाऊन केलेली बंडखोरी तर्कसंगत ठरवण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळे कारण पुढं करत आहेत. सध्या आमगाव विधानसभा मतदारसंघातही तेच बघायला मिळतंय. महायुतीच्या मित्र पक्षाच्या बंडखोरीने आमगाव विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस (महाविकास आघाडी) उमेदवाराच्या नाकी नऊ आणलेत. असं असताना बंडखोरी करुन खंबीरपणे उभे असलेले विलास चाकाटे यांनी केलेली ही बंडखोरी कॉंग्रेस पक्षातर्फे झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी असल्याचा दावा केला आहे. ही बंडखोरी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आहे, असं सांगत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ज्यात राष्ट्रीय गोंडवाना पार्टी बिरसा ब्रिगेडचे विलास भोगारे यांनी बंडखोर व अपक्ष उमेदवार विलास चाकाटे माझे जुने मित्र असुन लवकर ते माझ्या समर्थनात माझ्या सोबत उभे राहणार असल्याच्या भोगारे यांच्या वक्तव्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. तर आमगाव विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार विजयी होणार? की राष्ट्रीय गोंडवाना पार्टी बिरसाब्रिगेडचे विलास भोगारे बाजी मारणार? की या दोघांच्या संघर्षात महायुती आमगाव विधानसभेत विजयी होणार का? हे येणाऱ्या 23 तारखेला स्पष्ट होईल. मात्र, या नव्या चाकाटे-भोगारे पॅटर्नमुळं महाविकास आघाडीत खास करुन काँग्रेस मध्ये कडुनिबामच जुस पेल्याच चित्र आहे.
विलास भोगारे यांची प्रतिक्रिया…
सध्या आमगाव विधानसभा निवडणुकीत चाकाटे – भोगारे पॅटर्न गाजतोय. काँग्रेस पक्षा अंतर्गत कार्यकर्त्याकडे नियोजनाचा अभाव असल्याने व महाविकास आघाडीने विद्यमान आमदार सहसराम कोरोटे यांची टिकीट कापल्याने कॉंग्रेस पक्षा अंतर्गतच जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हे प्रकरण आमगाव वरुन मुंबईपर्यंत, त्यानंतर मुंबईवरुन दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे. राजकुमार पुराम यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मिळाली. मात्र,महाविकास आघाडीच्या मित्र पक्षातील विलास चाकाटे यांनी बंडखोरी केल्यानंतर आमगाव पॅटर्न चर्चेत येऊ लागला. पण आता लवकरच आमगाव – देवरी विधानसभा मतदार संघात चाकाटे – भोगारे पॅटर्ण सुरू होणार असुन महायुती व महाविकास आघाडीला हार पत्कारावी लागनार आहे.
आम्ही तर आपल्या अपमानाचा बदला घेतोय – विलास चाकाटे
माझे कार्यकर्ते व सहकारी पूर्ण शक्तीनं प्रचार करताना आपल्याला दिसून येत आहेत. तर माझे मित्र असलेले राष्ट्रीय गोंडवानां बिरसा ब्रिगेडचे उमेदवार विलास भोगारे हेदेखील याच मतदारसंघात राजरोसपणे लागुन असल्याचे दिसून येतात. माझ्या “पक्षाने माझ्यासोबत गद्दारी करत कॉंग्रेसला उमेदवारी दिली. त्या गद्दारीमुळे मी अपक्ष दावेदारी दाखल केली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करून मला अपमानाचा बदला घ्यायचा आहे. राष्ट्रीय गोंडवाना पार्टी बिरसा ब्रिगेडचे विलास भोगारे यांच्या समर्थनात जान्यासाठी माझ्या कोर कमीटीसी चर्चा करुन भोगारे यानां समर्थन राहणार की नाही हे मी उद्या स्पष्ट करनार आहे.
