गोंदिया ( देवरी ) : राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेड व CFR समितीचे उमेदवार विलास भोगारे हे आमगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक असताना आमगाव मतदारसंघात विलास भोगारे यांना विलास चाकाटे यांच्याकडुन काल (दि.16) ला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. चाकाटे यांच्या पाठिंब्यामुळे विलास भोगारे यांना विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात असतांनीच बहुजन मुक्ती पार्टीनेही विलास भोगारे यांना समर्थन जाहीर केले आहे. ज्यामुळे आमगाव – देवरी विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत रंगात येणार आहे.
