शालेय क्रीडा स्पर्धामध्ये शालेय  विद्यार्थ्यांचे सुयश

गोंदिया (देवरी) : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उपजत क्रीडा कौशल्य असून त्यांना योग्य तो सराव दिल्यास आश्रम शाळेतील प्रतिभावान विद्यार्थी खेळामधून पुढे करिअरच्या रस्त्यावर यशस्वी मार्गक्रमण करू शकतात हा हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी क्रीडा विषयक नैपुण्य असणाऱ्या शिक्षकांकडून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची बॅटरी टेस्ट घेऊन त्यांच्यामध्ये असलेल्या उपजत कौशल्यांच्या आधारे त्यांची विविध खेळासाठी निवड केली. खेळाबाबत ग्रामीण भागातील क्रीडा स्नेही शिक्षकांकडून  विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. याचा निकाल प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धांमध्ये दिसून आला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी 17 क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या आधी  63 मुलांनी तालुकास्तरावर व 14 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर प्राविण्य प्राप्त केले होते.
      याकरिता सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) श्री शिरीष सोनेवाने व श्री सुनील भुसारी तसेच प्रकल्प क्रीडा समन्वयक श्री धनिराम तावाडे यांचे सहकार्य लाभले.                
विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी
1. कु. संध्या राकेश भोयर आश्रम शाळा बोरगाव 400मी प्रथम
2.कु. हसिनी बहेकार आश्रम शाळा जमाकुडो 1500मी प्रथम
3. चेतन मडावी आश्रम शाळा कडीकसा गोळा फेक प्रथम
4. लीना काटेंगे आश्रम शाळा बोरगांव 800मी प्रथम
5. त्रिवेणी कोराम आश्रम शाळा बोरगाव 100मी  प्रथम
6. प्रेरणा मडावी आश्रम शाळा बोरगांव 100मी  द्वितीय
7. दक्षिणा मडावी आश्रम शाळा बोरगांव थाळी फेक द्वितीय
8. माया नरेटी आश्रम शाळा बोरगांव 200 मी प्रथम
9. माया नरेटी आश्रम शाळा बोरगांव लांब उडी प्रथम10.  .कु. हसिनी बहेकार जमाकुडो 3000मी प्रथम
11. नीलम कुंभरे आश्रम शाळा बिजेपार भाला फेक प्रथम
12. मोहिनी मडावी आश्रम शाळा कडीकसा भाला फेक द्वितीय
                               14 वर्षे
1. कल्याणी तुळशीराम फुलकुवर शासकीय आश्रम शाळा पालांदुर 400 मी प्रथम
2. करीना परतेकी शासकीय आश्रम शाळा शेंडा लांब उडी द्वितीय
                               17 वर्षे
1. कु. उर्वशी ब्रह्मनाईक इळदा 1500 मी प्रथम 2. कु. प्रतीक्षा सलामे आश्रम शाळा इळदा 200 मी द्वितीय
3. कु. प्रतीक्षा सलामे आश्रम शाळा इळदा भाला फेक प्रथम
प्रथमच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे यामध्ये 14 विद्यार्थी विभाग स्तरापर्यंत पोहोचले यामुळे विद्यार्थ्यांना खेळामध्ये करिअर करण्याबाबतचे मार्ग दिसून आले सबब यापुढे जिल्ह्यातील फिजिकल एज्युकेशन कॉलेज, क्रीडा स्नेही शिक्षक व ग्रामीण भागामध्ये क्रीडा विषयक आवड असणाऱ्या खेळाडूंची मदत घेऊन पुढील सत्रांमध्ये व येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील आणि क्रीडाविषयक प्राविण्य प्राप्त करून आपले उत्तम करिअर घडवण्यासाठी आवश्यक ते नियोजन प्रकल्प कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
( उमेश काशिद )
प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
देवरी जि. गोंदिया

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें