शिरपुर आरटीओ चेकपोस्ट : आर्थिक लुटीचा अड्डा

गोंदिया ( देवरी ) ; तालुक्याच्या शिरपुर (RTO Checkpost) सीमेवर असलेला सीमा शुल्क तपासणी नाका येणार्‍या जाणार्‍या वाहन चालकांच्या आर्थिक लुबाडणुकीचे केंद्र बनले असून येथील अधिकार्‍यांना मेवा दिल्याशिवाय साधा ट्रकसुद्धा या चेकपोस्टवरून पास होऊ शकत नाही. यासाठी येथे पंटरांची फौज कार्यान्वित असून अधिकार्‍यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाचा दररोज कोट्यवधींचा महसूल लाटणारी आरटीओ चेकपोस्ट बनली आहे. या चेकपोस्टवरून नागपूर – रायपुर व रायपुर – नागपूर या मार्गावरची वाहने जात असतात. पैसे दिल्याशिवाय जाता अथवा येता येत नाही. या प्रकारात राज्याचा लाखोंचा महसूल बुडत असून, शिरपूर चेकपोस्टमुळे माहाराष्ट्र राज्याची बदनामीही होत आहे.

ऐकीकडे इंधन महाग झाल्याने (RTO Checkpost) महागाईचा मार ट्रकचालकांवर पडत असून अधिकारी मात्र गब्बर होत आहेत. दुसरीकडे परिवहन अधिकार्‍यांच्या अवैध वसुलीमुळे ट्रकचालकसुद्धा आर्थिकदृष्ट्या त्रासले आहेत. त्यामुळे, देवरी तालुक्यातील शिरपूर  चेकपोस्टची आर्थिक चौकशी करावी, अशी ट्रकचालकांची मागणी आहे. या ठिकाणी वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. यासाठी प्रशासकीय इमारतीत चक्क एका खिडकीतून अवैध वसुली घेतली जात असल्याचा आरोप येथील वाहन चालक करीत आहेत. विशेष म्हणजे नेमकी या मार्गाने वाहतूक टोकनरूपी पास दिल्याची धक्कादायक माहिती वाहन चालक देतात. व मासीक पास संपली की शिरपूर परीसरातीलच हॉटेलातुन वाहनचालकांना हिपास हजारो रुपये वाहनचालकांकडुन घेत नवी पास वाहनचालकांना दिली जाते.  हा प्रकार दररोज सुरु असून वाहन चालकाना फुकट आर्थिक भुर्दंड भरावा लागतो आहे. त्यामुळे, शासनाने ही अवैध वसुली बंद करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.

ती खिडकी ‘कुबेराचे द्वार’ महाराष्ट्राचीच बदनामी…

कागदपत्र बरोबर असले तरी तपासणीची एक खास शैली आहे. वाहन थांबवले जाते. (RTO Checkpost) कायद्याचा धाक दाखवून काहीतरी कारवाई करण्याची धमकी आरटीओनी चेकपोस्टवर उभे ठेवलेल्या फंटराकडून  दिली जाते. शिरपूर चेकपोस्टवर नियमांना धाब्यावर बसवल्या जात असल्याचा आरोप ट्रकचालकांचा आहे. महाराष्ट्रात प्रवेश केल्याची पूर्तता केल्यानंतर ही महाराष्ट्रातील अधिकार्‍यांची लुबाडणूक थांबवण्याची आणि चेक पोस्टची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी परप्रांतातील वाहन चालक आता करीत आहेत. हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र राज्याचीच बदनामी करणारा असल्याची या परप्रांती वाहनचालकांचे म्हणणे आहे. लवकरच देवरी तालुक्यातील शिरपूर चेकपोस्टवर वरीष्टानां निवेदन देत आंदोलन केल्याजानार असल्याचा स्थानीक सामाजीक संघटनाच्या पदाधीकार्यानीं सांगीतले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें