संजुबा हायस्कूल (CBSC) नागपूर व गोंदिया जिल्हा पोलीस यांचा उपक्रम

गोंदिया ( गोठणगांव ) : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे  “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा. यांचे संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक पाटील सा, पोलिस स्टेशन केशोरी चे ठाणेदार श्री. मंगेश काळे सा. यांचे मार्गदर्शनात आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व कृष्णजन्माष्टमी निमित्त पोलिस मदत केंद्र गोठणगाव अंतर्गत येणाऱ्या अती दुर्गम भागात राहणाऱ्या तसेच गरिबातल्या गरीब ज्यांकडे शेती नाही व त्यांचा उदरनिर्वाह हा धान्य बाजारातून विकत घेऊन करणे असतो, अशा 60 कुटुंबांना ए.ओ.पी. गोठणगाव येथे बोलावून शिधा वाटप करण्यात आले . सदर चे शिधा ह्या संजुबा हायस्कूल (CBSC) नागपूर येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपापल्या घरुन जमेल तसे आणून एकत्र केले व सदर चे शिधा हे विशाल पाटील, विकास पाटील, राजीव वरभे (ट्रस्टी) नूतन शिक्षण संस्था नागपूर व सुहास खरे NGO नागपूर यांच्या  मदतीने दिनांक 07/08/2025 रोजी ए. ओ. पी. गोठणगाव येथे रक्षाबंधन कार्यक्रमाच्या अनुषंगाने एओपीस सुपूर्त करण्यात आले होते. त्यामधील तांदूळ, डाळ, साखर, निरमा पुडे इत्यादी उपजिविकेचे साहित्य  हे गांधारी- 15, जांभळी- 6 उमरपायली- 25, डोंगरगाव – 9 डक्कूटोला- 2 सुरबन- 1 आणि जरूघाटा – 2 असे 7 गावामधून ऐकून 60 कुटुंबांना प्रत्येकी तांदूळ, डाळ, साखर, निरमा पुडे असे टोटल 13 ते 15 किलो खाद्यान्न वाटप करण्यात आले. सदर चा कार्यक्रम एओपी गोठणगाव येथे श्री काळे सर ठाणेदार केशोरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया रतीराम राणे, उपसरपंच ग्राम पंचायत गोठणगाव कांतिलाल डोंगरावर उपस्थित होते. सदर कार्यक्रम एओपी गोठणगाव चे प्रभारी अधिकारी पोउपनि निळकंठ गित्ते यांच्या पुढाकाराने व SRPF चे psi मनोहर राठोड, जिल्हा पोलीस चे ASI अंबुले, हवालदार भोवते, मिसार , srpf चे हवालदार शहारे, इतर अंमलदार व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्ती यांच्या मदतीने संपन्न झाला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें