गोंदिया ( देवरी) : दि 8 ऑगस्ट 2025 रोजी देवरी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ला लागून असलेल्या धकेश्वरी मंदिर परिसरात असलेल्या पवन तलावात अनोळखी व्यक्तीच्या मृतदेह परिसरातुन जानार्या नागरीकांना दिसला असता नागरीकांनी तात्काळ देवरी पोलिसांनी याची माहिती दिली. माहिती देताच देवरी पेलिसानीं घटना स्थळ गाठत पाहनी केली असता सदर मृत व्यक्ती सांरग देसपांडे वय – 29 रा. देवरी तहसील ऑफिस समोर असल्याची ओळख पटली. ज्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
आज दि. 8 ऑगष्ट शुक्रवार रोजी सकाळी 10.00 वाजता सुमारास सदर घटना निदर्शनत येताच सारंगची हत्या की आत्महत्या च्या चर्चेला उधान आले आहे. सदर मृतदेह पान्याबाहेर काढन्यात आला असुन ग्रामीन रुग्नालय देवरी येथे शवविच्छेदना करीता पाठविन्यात आले आहे. सारंग देशपाडें याची हत्या कि आत्महत्या हे शविच्छेदना नंतर समंजुन येनार असुन या घटनेने देशपांडे व मित्र परीवारात शोककळा पसरली आले.
