सी एस इंग्लिश पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेहसम्मेलन सोहळा
उत्साहात साजरा!

देवरी : स्थानिक देवरी येथील कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी द्वारा संचालित तालुक्यातील अग्रगण्य विद्यालय सीएस इंग्लिश पब्लिक स्कूल येथे नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. “स्वर्णिम भारत-विरासत और विकास” या मध्यवर्ती विषयावर आधारित विविध रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे,तथा प्रमुख अतिथी म्हणून  भंडारा गोंदिया जिल्हा भाजपा समन्वयक वीरेंद्र अंजनकर, सुफलाम इंडस्ट्रीज लिमिटेड चे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार पांडे हे होते. तसेच संस्थेचे सचिव अनिल कुमार येरणे कोषाध्यक्ष जयश्रीताई येरणे, कृष्णा ताई येरणे, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुमार येरणे, डॉ. सौ प्रियंका ताई येरणे,विद्यालयाचे प्राचार्य अश्मित पिल्लई, तथा शिवाजी संकुल च्या इतर विभागातील प्राचार्य प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
  या कार्यक्रमांमध्ये  प्रामुख्याने महाभारत, रामायण, शिवतांडव नृत्य, जालियनवाला बाग हत्याकांड, तसेच संपूर्ण  भारतातील राज्ये आणि त्यांची लोककला आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. तसेच भारतातील गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर, रतन टाटा, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना नृत्यातून मानवंदना देण्यात आली.
स्नेहसंमेलनामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा  समावेश होता. कार्यक्रमांमध्ये नर्सरी च्या विद्यार्थ्यांपासून तर दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व आपल्या गुणांचे कौशल्य सादर केलेत.
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील समन्वयी का सायमा शेख तसेच दहावी व वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार विद्यालयातील समन्वयिका अंजुलता शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला पालकांची तसेच समस्त देवरी नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, परिचर यांनी अथक परिश्रम घेतले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें