नवीन वर्ष सुरू होण्यास ऐक दिवस शिल्लक आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरीक सज्ज झाले असले तरी यंदा नववर्षाचे स्वागत करताना शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवरी – चिचगड पोलिसही सज्ज झाले आहेत.
देवरी : नवीन वर्ष सुरू होण्यास ऐक दिवस शिल्लक आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरीक सज्ज झाले असले तरी यंदा नववर्षाचे स्वागत करताना शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवरी – चिचगड पोलिसही सज्ज झाले आहेत. देवरी व चिचगड परिसरात असणाऱ्या शेतघरांवर रेव्ह पार्टी आयोजनावर पोलिसांची करडी नजर आहे. अमली पदार्थ सेवन आणि मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने सर्व तयारीही केली आहे. त्यामुळे जोशात नववर्ष स्वागत करीत असताना कुठल्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नका, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी केले आहे.
देवरी – चिचगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक नागरीक दाखल होतात. मात्र या नागरीकांकडून कोणत्याही नियमांचा उल्लंघन होऊ नये, यासाठी देवरी – चिचगड पोलीस सज्ज झाले आहेत. मद्य प्राशन करून गाडी चालवू नये. त्यामुळे स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन विवेक पाटील यांनी केले आहे. देवरी पोलिसांकडून थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी, त्याशिवाय वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. यात 1 अधिकारी , 10 पोलिस अमलदार यांचे स्ट्राइकिंग फोर्स , 10 पोलिस अमलदार यांचे रीझर्व फोर्स प्रत्तेकी पोलिस स्टेसन प्रमाने समावेश आहे.
नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करावे मात्र कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये किंवा त्या करू नयेत, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे कोणत्याही पार्टीचे आयोजन केल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होतील.
विवेक पाटील, (उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी)
