गोंदिया ( देवरी ) ; होळी, धुलिवंदन , रमजान ईद उत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर देवरी पोलिस ठाण्याच्या वतीने देवरी शहरातून रुट मार्च काढण्यात आले. देवरी पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण डांगे यांनी सांगितले की, आगामी होळी, धुलिवंदन व रमंजान ईद उत्सवाच्या दृष्टीने पोलिस अधिक्षक गोंदिया, अप्पर पोलिस अधिक्षक गोंदिया व उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. देवरी पोलिस ठाण्यापासून सुरू झालेला हा रुट मार्च शिस्तबद्ध पद्धतीने देवरी शहरात काढण्यात आला. पोलिस अधिकारी, शिपाई यांना बघितल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक, वाहनचालक कुतूहलाने रस्त्याच्या कडेला उभे राहून काय झाले, अशी विचारणा करतांना दिसले. विशेष कारणांसाठी ही कारवाई नियमितपणे होत असल्याचे लक्षात येताच ते रुट मार्च होईपर्यंत नागरीक बघत राहिले.
या रूट मार्च मधे पोलीस स्टेशन देवरी येथील स.पो.नी. मुकेश राठोड, ओमंप्रकास गेडाम, पो.उ.नी. मिलींद गेडाम, 28 अंमलदार, 15 सैनिक हजर होते. सदर रूट मार्च पोलीस स्टेशन देवरी येथून सुरू करुन देवरी शहरातील मुख्ये मार्गाने मुख्य चौकातुन परत देवरी पोलिस्टेसन येथे या पोलिस रूट मार्चची सांगता करण्यात आली.









