11 नक्षल्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्णण ; पोलिसांचे मोठे यश…

एकुण 89 लाखचे बक्षिस होते पोलिसांचे मोठे यश

गोंदिया  ;  महाराष्ट्र -छत्तीसगड राज्याच्या सीमेत मोठ्या प्रमाणावर नक्षली कार्यवाया घडवून आणणाच्या नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठा हादरा बसला आहे. आज घडलेल्या मोठ्या कार्यवाहीत दरेकसा दलमच्या 11 नक्षल्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. परिणामी, गोदिया जिल्ह्यातून दरेकसा दलम जवळजवळ संपल्यात जमा झाल्याचे बोलले जात आहे.

ही मोठी कार्यवाही गडचिराली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश गोयल, गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे. देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

आत्मसमर्पण करण्याच्या नक्षल्यांमध्ये २५ लाखाचे बक्षिस असलेला दरेकसा दलम प्रमुख विकास नागपूरे याचा समावेश आहे. विकास नागपूरे हा अनंत नावाने दलम मध्धे सक्रीय होता. अनंत हा नक्षल्यांचे पत्रव्यवहार करीत असे. आत्मसमर्पण करणार्या 11 नक्षल्यापैकी 7 जवळ हत्यारे होती. यामध्ये 3 आधुनिक हत्यारे असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना या कार्यवाही मुळे मोठे येश मिळाले असून दरेकसा दलमचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले असून आता केवळ बोटावर मोजण्याएवढे 2 – 3 सदस्य शिल्लक असल्याची शक्यता आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब