281 वाहनांवर कार्रवाई, 2 लाख 66 हजार 750 रुपयांचा ठोठावला दंड

गोंदिया : जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 281 वाहन चालकांवर कार्रवाई करण्यात आली तर 103 वाहन जप्त करण्यात आली आहेत. या वाहन चालकांवर 2 लाख 66 हजार 750 रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. सदर माहिती 21 डिसेंबर रोजी जिला वाहतुक शाखेत आयोजित पत्रपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी दिली.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी स्वारांवर विशेष मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढेही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जिल्हा वाहतुक शाखेतर्फे संपुर्ण जिल्हयात वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले आहे. सदरची विशेष मोहीमे दरम्यान सपोनि राहुल पाटील जिल्हा वाहतुक शाखा गोंदिया, सपोनि गेडाम पो. स्टे. गोंदिया शहर, महिला पोलीस उपनिरीक्षक शेख पो. स्टे. गोंदिया ग्रामीण, महिला पोलीस उप निरीक्षक नेहे पो. स्टे. रामनगर, पोलीस उपनिरीक्षक बागुल पो. स्टे. रावणवाडी तसेच पेट्रोलिंग पथकातील सफौ रविंद्र भुरे व जिल्हा वाहतुक शाखेतील संपुर्ण पोलीस अंमलदार यांनी या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेवुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर उत्कृष्टरीत्या कारवाई केलेली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें