गोंदिया (तिरोड़ा) : दिनांक 20/10/2024 रोजी उमरेड येथील अट्टल मोटार सायकल चोरट्या कडून पो. ठाणे तिरोडा येथील गुन्ह्याचे अनुषंगाने चोरीच्या एकूण 18 मोटार सायकल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेल्या आहेत.. सदर संबंधाने पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचने प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहिल झरकर,यांचे मार्गदर्शनात. पो.नि. स्थागुशा श्री दिनेश लबडे, आणि पो. नी. अमित वानखेडे, पो.ठाणे तिरोडा यांचे नेतृत्वातील पोलीस पथकाद्वारे आज दिनांक 21/10/2024 रोजी गुन्ह्याचा अधिकचा तपास करण्यात येत असताना गुन्ह्यातील अटक आरोपीतांना पो. स्टे. तिरोडा आणि जिल्ह्यातील ईतर पो.स्टे अंतर्गत नागरीकांच्या चोरलेल्या मोटार सायकल संबंधाने कसून विचारपूस सखोल चौकशी तपास केला असता.....आरोपीतांनी आणखी मोटार सायकल चोरल्या असल्याचे निष्पन्न झाल्यावरून आज रोजी पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच तिरोडा पोलीस पथकाने चोरीच्या आणखी 25 मोटार सायकल हस्तगत करून जप्त केलेल्या आहेत.....आरोपी कडून *आतापर्यंत एकूण 43 मोटार सायकल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेल्या आहेत...* सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व पोलीस ठाणे तिरोडा पोलीस पथक यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे...

मा. वरिष्ठांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे आणि पो.ठाणे तिरोडा येथील अधिकारी, अंमलदार पथक यांचे कौतुक अभिनंदन केले आहे.
