विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार

गोंदिया :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या मतदानावेळी मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्राशिवाय इतर बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता गोंदिया जिल्ह्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे ते मतदार, मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकतात.

मात्र जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत,अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र / राज्य सरकार / सार्वजनिक उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र हे पुरावे सादर करता येऊ शकतात अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें