गोंदिया (आमगांव) : आमगाव विधानसभा मतदार संघात आज मोठ्या घडामोडी घडत आहे. राज्याचे लक्ष आमगाव विधानसभेकडे आहे. राष्ट्रीय गोंडवाना पार्ट्री व बिरसा ब्रिगेडचे विलास भोगारे हे या आमगाव विधानसभा निवडणूकीत कुणाची जिरवणार व स्वत: कसे निवडून येणार याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले विलास भोगारे?
विलास भोगारे यांच्या भूमिकेकडे राज्यासह आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांसह महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यांनी राष्ट्रीय गोंडवाना पार्टी कडुण उमेदवारी अर्ज दाखल केला असुन त्यांच्या प्रचाराचा जोर मतदार संघात जोरावर आहे. त्यामुळे आमगाव विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या फडात एकच रंगत येण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला या राष्ट्रीय गोंडवाना पार्टीच्या उमेदवारामुळे कुणाला किती फटका बसतो हे लवकरच समोर येनार आहे. पण होऊ घातलेल्या आमगाव – देवरी विधानसभेत जातीय समिकरन निर्णायक ठरनार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार भोगारेच्या भूमिकेकडे गांभीर्याने लक्ष केन्द्रींत करुन आहेत, हे विशेष.
महायुती व महाविकास आघाडीवर टीका…
मी नवीन आहे. त्यामुळे मला राजकारण करता येत नाही. मि जल, जमीन, जंगल व आदिवसी समाजाच्या हितासोबत बेरोगार युवकांच्या रोजगारासाठी निवडणूक लढवित आहे. मी सर्वांना सांगितलं आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. माझा समाज माझे मतदार माझ्या संघटना माझा पक्ष माझ्या सोबत आहे, असा दावा भोगारे यांनी केला आहे. आजपर्यंत झालेल्या आमदारांनी फक्त पोकळ आश्वासन दिले. बेरोजगारानां आणखी बेरोजगार केलं म्हणून मी लढत आहो. आम्हाला नाद नाही. आम्हाला कुणाची तरी जिरवायची असून ही विधानसभा निडणूक जिकांयची आहे. असे सूचक वक्तव्य त्यांनी नाव न घेता केले आहे.
जातीसाठी व बेरोजगारांसाठी आम्हाला आधार करायचा आहे…
आम्हाला गरीब आदिवासी समाजाला हक्काचा अधिकार करायचा आहे. त्यांना चार उंबरे घर हक्काचं रोजगार करायचं आहे. बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे. आदिवासी समाजाचे आमदार खासदार आहेत. पण आम्हाला आधार नाही. आम्हाला दार उघडं नाही. आम्हाला आमचा हक्काचा आमदार पाहिजे. आमचा म्हणून काम सांगायचं आहे. मला माझ्या मतदार संघातील मतदारांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी या विधानसभेच्या निवडणूकीत उतरावे लागले आहे.
