जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यांची व्दितीय प्रशिक्षणास भेट

गोंदिया (देवरी) :  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा घोषित केल्यानुसार ६६- आमगांव विधानसभा मतदार संघात दिनांक १३ व १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पथकाचे व्दितीय प्रशिक्षण संपन्न झाले. सदर चे प्रशिक्षण प्रत्येक दिवसाला दोन सत्रात ठेवण्यात आले होते. दिनांक १४ नोव्हेंबर रोजी मा.श्री. प्रजित नायर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया यांनी प्रथम सत्रात भेट दिली. तसेच मतदान पथकास मार्गदर्शन केले. निवडणुकीचे कामे जवाबदारीने पूर्ण करावे व कोणतेही चुक होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपणास काही बाबी समझले नसल्यास आजच्या सभेमध्ये समजुन घ्यावे. असे आव्हान मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया यांनी केले.

सदर चे प्रशिक्षण श्रीमती. कविता गायकवाड निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, देवरी यांचे अध्यक्षतेखालील मतदान पथकास प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण मा. श्रीमती. मोनीका कांबळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार आमगांव तसेच मा. श्री. महेन्द्र गणविर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार देवरी यांनी दिले. तसेच श्री. अंबुले माष्टर ट्रेनर यांनी प्रस्तावणा केले. सदर चे प्रशिक्षण दोनदा घेण्यात आलेले असुन यापूर्वी लोकसभा निवडणूक संपन्न झालेले असुन त्या निवडणुकीचा आपणास अनुभव असुन ही निवडणूक सुध्दा योग्यत्या कार्यपध्दतीने पार पाडणार तसेच मतदान केंद्रावर जाण्या करिता शासकिय वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली असून कोणीही आपल्या खाजगी वाहनाचा उपयोग करणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच काही पथकांनी मागील वेळेस आवश्यकते कागज पत्रे भरतांनी चुक केली होती. तसी पूर्णवृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें