विलास भोगारे यांची ताकद दुप्पट, अखेरच्या क्षणी विलास चाकाटे यांचा पाठिंबा..

मतदानाला अवघे 4  दिवस शिल्लक असताना आमगाव – देवरी  मतदारसंघात विलास भोगारे यांना महाविकास आघाडीचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विलास चाकाटे यांच्या कडुन  पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या चाकाटे यांच्या पाठिंब्यामुळे विलास भोगारे यांना विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

  गोंदिया ( देवरी ) :  राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेड व CFR समितीचे उमेदवार विलास भोगारे  हे आमगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे  उमेदवार माजी आमदार संजय पुराम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजकुमार पुराम यांचं आव्हान असणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक असताना आमगाव मतदारसंघात विलास भोगारे यांना विलास चाकाटे यांच्याकडुन  पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. चाकाटे यांच्या पाठिंब्यामुळे विलास भोगारे यांना विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.


राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेड पार्टीचे उमेदवार विलास भोगारे यांना आमगाव  विधानसभेतून जाहीर पाठिंबा देण्यार असल्याची माहिती  चाकाटे यांनी आज चिचगड येथील प्रचार सभेत केली आहे. “आमगाव – देवरी  विधानसभा मतदार संघात आदीवासी व OBC  समाज मोठ्या प्रमाणावर आहे. ज्यात  विधानसभेत आदिवासी समाजाची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. गोरगरीब लोकांसाठी असणारी आपुलकी आणि त्यांच्या अडचणींमध्ये धावत जाऊन त्यांना मदत करण्याच्या विलास भोकारे यांच्य  भूमिकेचे मी स्वागत करतो. म्हणूनच आम्ही विलास भोगारे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत” , असे चिचगडच्या भर सभेत अपक्ष उमेदवार  विलास चाकाटे यांनी राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेडचे उमेदवार विलास भोगारे  यांची भेट घेत भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेड ही सर्वात मोठी संघटना….

राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेड ही  समाजामध्ये सर्वात मोठी संघटना असून या संघटनेमार्फत समाजातील धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. आदिवासी  समाजातील सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय गोंडवाना व बिरसा ब्रिगेडमुळे जोडले गेले आहेत. आदिवासी समाजाच्या स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी आणि आदिवासी समाजाचे, समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक,आदिवासी धर्मपीठाचे पदाधिकारी  हे सर्वजण राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेडशी निगडीत असल्याने राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे उमेदवार विलास भोगारे यांच्या उमेदवारी मुळे व अपक्ष उमेदवार विलास चाकाटे  यांनी दिलेल्या जाहीर पाठिंबामुळे राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेडचे उेदवार विलास भोगारे यांच्या  विजयी मताधिक्यात नक्कीच वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार स्पर्धेतच नसल्याचे चित्र मतदार संघात चर्चा…

राष्ट्रीय गोंडवाना पार्टी बिरसा ब्रिगेडचे आमगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विलास भोगारे यांना बंडखोर व अपक्ष उमेदवार विलास चाकाटे यांच्या समर्थना मुळे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची चांगलीच धाकधुक वाढली आहे. तर आमगाव विधानसभेमध्ये आता महायुती वर्षेस  राष्ट्रीय गोंडवाना पार्टी बिरसाब्रिगेडचे विलास भोगारे  असी दुहेरी लढत पहायला मिळनार असुन महाविकास आघाडी या आमगाव – देवरी विधानसभा मतदार समघात स्पर्धेतच नसल्याचे चित्र असुन मतदार संघात चांगलीच चर्चा रंगली आहे. महायुतीचे संजय पुराम वर्षेश राष्ट्रीय गोंडवाना बिरसा ब्रिगेडचे विलास भोगारे हे दोघेच स्पर्धेत असल्याने  मतदार संघात चर्चेला उधान आला आहे. तर चाकाटे-भोगारे या नव्या पॅटर्नमुळं महायुतीचीही धाकधुक वाढली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें