देवरी : स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे दि. ०१/०१/२०२५ रोज बुधवारला नवीन वर्षाचे विद्यार्थ्यांच्या वतीने रंगारंग कार्यक्रम सादर करून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एम. जी. भुरे सर प्राचार्य हे होते तसेच प्रमुख अतिथी श्री. जी. एम. काशीवार, मुख्याध्यापक, प्राथ. विद्यामंदिर, श्री. पी. एस. खैरे, श्री. एस. टी. भांडारकर हे मंचावर उपस्थित होते.
यावेळी प्रथमतः माॅ शारदा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पन करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी गीतगायन, समुह नृत्य, एकल नृत्य, नक्कल इ. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वन मिनिट शो च्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षांनी व प्रमुख अतीथींनी उपस्थित विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना नवीन वर्षानिमित्ताने शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे तयार केलेले भेटकार्ड, राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत चित्रकला प्रदर्शनी तसेच विज्ञान प्रदर्शनीचे मॉडेल यांची प्रदर्शनी लावण्यात आली.
समारोपीय बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एम. जी. भुरे सर प्राचार्य तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. अजीत पाटील साहेब, ए.पी.आय., पोलिस स्टेशन, देवरी, श्री. मुकेशजी खरोले, पत्रकार, देवरी, श्री. मोहसीन अंसारी, माजी विद्यार्थी तथा पत्रकार व श्री. जी. एम. काशीवार मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. मुकेशजी खरोले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. टी. मेश्राम, सूत्रसंचालन कु. स्नेहा राऊत व सांस्कृतीक कार्यक्रमाचे संचालन श्री. एस. टी. मेश्राम, श्री. एस. टी. भांडारकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. एस. जी. काशिवार यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
