गोंदिया ( देवरी ) : स्मार्ट सिटी म्हणून नाव लौकिक असलेल्या देवरीने प्रदूषणातही आघाडी घेतली आहे. ही बाब देवरीकरांची चिंता वाढवणारी आहे. धूलिकणांपासून संरक्षण करण्यासाठी आता मुलींप्रमाणेच माणसांनाही दुचाकीवरून जाताना तोडाला रूमाल बांधण आवश्यक बनले आहे. एकीकडे उद्योगांनी येथे मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या कारखान्यातून निघालेल्या धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे निकष घालून दिले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन केले जात असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नमूद करीत आहेत तर दुसरी कडे याचा विपरीत परीणाम मानवी आरोग्यावर होतांनी दिसत आहे.
देवरी शहरात केवळ उद्योगाच्या धुरातूनच प्रदूषण होत नसून, महामार्गाने चालत असलेले वाहन ,शहरांतून बाद झालेल्या रिक्षा तसेच अन्यवाहनांची शहरात राजरोसपणे चलती आहे. त्यातच इंधनातील भेसळ हा देखील प्रदूषण वाढीत महत्वाचा घटक ठरत आहे. त्यातच सुरू असलेली बांधकामे, रस्त्यावरील धूळ आणि कुठल्याही कामासाठी खोदण्यात येत असलेला रस्त्यातून धुळीचे प्रमाण देवरीत क्षमतेपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा कचरा पेटवून दिल्याने देखील धुराचे लोट उठतात. या धूळ आणि धुरामुळे मानवाच्या श्वसन प्रक्रियेवरच हल्ला होतो. धुळीचे कण अतिसूक्ष्म असल्याने ते तोंडाला रूमाल बांधूनही फुफ्फुसात जातात. त्यामुळे शरीराची मोठी हानी होते. ही हानी होत असताना ती अत्यंत मंद गतीने त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे हाच एक यावरील प्रभावी इलाज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काळजी घेणे हेच आपल्या हाती. . .
शहरातील विविध भागांत सुरू असलेली बांधकामे ही अविरत सुरू राहणार आहेत. तसेच शहराच्या MIDC येथिल उद्योग म्हटल्यावर त्यातून धूर हा निघणारच आहे. परंतु हे सर्व होत असताना देवरीतील धुळीचेप्रमाण कमी करण्यावर भर देण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सर्व काही सरकार करेल हीभूमिका चुकीची आहे. देवरीतील प्रदूषणात नायट्रोजन आक्साईड, सल्फरडाॅय आँक्साईड मोठ्या प्रमाणावर वातावरणात पसरत आहे. त्याचे अतिसूक्ष्म कण हे मानवी शरीरात केव्हा प्रवेश करतात है समजतही नाही. त्यामुळे प्रदूषणापासून वाचण्यासाठी सरकारसह नागरिकांनी देखील कमीतकमी अस्वच्छता पसरविण्याची गरज आज स्थितीत निर्मान झाली आहे.
प्रतिक्रीया…
आमच्याकडे नागरिकांच्या तश्या तक्रारी आल्यास संबंधित कारखान्यांना नोटीस issue केल्या जातील.. तसेच MPCB ला सुद्धा त्यासंबंधित अहवाल मागविला जाईल.
करिश्मा वैद्ये (मुख्याधिकारी नगरपंचायत देवरी)
प्रतिक्रीया…

शहरात प्रदूषण असल्यामुळे तोंडाला रुमाल बांधून चालावे लागत आहे. तसेच देवरी नगरपंचायत होताच न.प.च्यावतीने कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सूरु करण्यात आल्या आहे. मात्र,शहरातील नागरिकच या गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा एकत्रच टाकत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी जागृत होऊन कचरा गाड्यांमध्ये टाकावा. व नगरपंचायतने प्रतुषणासाठी उपाय योजना राबव्यात.
अनिल बिसेन (सभापती प.समीती देवरी)
प्रतिक्रीया….

शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात दिवसेन दिवस कारखान्यांच्या संखेत वाढ होत आहे. शहरातील नागरीकांनी यावर उपाय म्हणून प्रशासनाच्या वतिने दिली जानारी झाडांची लागवड करावी ज्यामुळे प्रदुषनावर मात करता येईल. व जेणेकरुन काही प्रमाणात तरी प्रदुषण कमी होईल. तसेच शहरातील नागरिकांनी, संघटनानीं जागृत होऊन MIDC व शहर परिसरात वृक्ष लागवड केले पाहिजे.
सचिन धात्रक (वन परिक्षेत्र अधिकारी देवरी)
प्रतिक्रीया…

आरोग्याच्या बाबतीत देवरी शहराची अवस्था हळुहळु बिकट होण्याची संभावना आहे , शहरातील अनेक नागरीकांना रस्त्यावरुन चालतांना तोडाला रुमाल बांधून चालावे लागत आहे. शहरात व तालुक्यात स्वशन रुग्नसॆखेत वाढ होत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे दुर्लक्ष असलेल्या संबधित यंत्रनेने लक्ष देण्याची गरज आहेत.
डॉ. गगण गुप्ता (आरोग्य अधिकारी ग्रा.रुग्नालय देवरी)
प्रतिक्रीया…

शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होतो. प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून, यासाठी नागरिकांनीच पुढ़ाकार घ्यायला हवा. व MIDC परीशरात असलेल्या शाळा कॉलेज येथिल विद्यार्थांच्या आरोग्याकडे योग्य तो लक्ष दिले पाहीजे.
चेतन ऊईके (शिक्षक)
प्रतिक्रीया…

देवरी शहराला लागुनच MIDC परिसर आहे ज्यात आज मोठ मोठे कारखाने सुरु झाले आहेत. त्याच MIDC परीसरत अनेक शाळा व कॉलेज आहेत ज्यात हजारो विद्यार्थी शिक्षन घेत असुन या MIDC परीसरातील प्रदुषनामुळे विद्यार्थांच्या आरोग्यावर मोठा परीणाम होन्याची भिती आहे. यावर संबधित विभाने योग्य त्या उपाययोजना करने आज स्थीतीत गरजेचे आहे.
मुकेश खरोले (सुजान नागरीक)
