गोंदिया : शिव उद्योग संघटनेने गोंदिया जिल्ह्यातील ड्रायव्हिंग (चारचाकी वाहन चालक परवाना) लायसन्स असलेल्या युवांसाठी एक सुवर्णसंधी जाहीर केली आहे. जर तुम्ही चारचाकी वाहन चालविण्यास कुशल असाल आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स धारण केले असेल, तर तुम्ही मुंबई आणि पुण्यात कार्यरत असलेल्या एक्हरेस्ट फ्लीट कंपनीमध्ये उबरसाठी गाडी चालवून दरमहा २४,০০० रुपये कमवू शकता. अशी माहिती वनामी फाऊंडेसन गोंदिया जिल्ह्याच्या अध्यक्षा शिल्पाताई बांन्ते यांनी प्रसार माध्यमांनी सांगितले आहे.
एवढेच नाही – कंपनी तुम्हाला सहा महिन्यांसाठी राहण्याची सोय देखील देईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नवीन कारकिर्दींची आरामदायी सुरुवात करता येईल. सुरुवातीच्या सहामहिन्यांनंतर, तुम्ही स्वत:च्या राहण्याची व्यवस्था करण्यास मोकळे असाल.
या अविश्वसनीय संधीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, बुधवार १३ फेब्रुवारी २०२५ रोजी देवरी शहराच्या चिचगड रोडवरील आफताब मंगल कार्यालयात आयोजीत चारचाकी परवाना धारक रोजगार मेळाव्यास रजर रहावे तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही शिल्पाताई बांते – ९३५६३६८९४७ किवां ८८५५०८६०५६ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुमच्या कारकिर्दीला सुरुवात करण्याची आणि उत्तम उत्पन्र मिळवण्याची ही संधी गमावू नका आणि उज्ज्वल भविष्याकड़े युवकांनी पहिले पाऊल टाकावे व गोंदिया जिल्ह्यातील चारचाकी परवाना धारकांनी या रोजगार मेळाव्यात उपस्तीत राहावे, असे आवाहन शिल्पाताई बांते यांनी बेरोजगार चारचाकी परवाना धारकांना केले आहे.
