चारचाकी वाहन परवाना धारकांचा जिल्हास्तरीय रोजगार मेळावा उद्याला

गोंदिया :  राज्यात वाढत चाललेल्या बेरोजगारीला रोजगार देन्यासाठी चारचाकी वाहन परवाना धारकांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी गोंदिया जिल्ह्यात वनामी फाऊंडेसनच्या जिल्हा अध्यक्षा शिल्पाताई बांते व युवा मराठी पत्रकार संघ देवरीने उपलब्ध करुन दिले आहे. हा रोजगार मेळावा उद्या दि.13 फेब्रुवारी 2025 ला देवरी शहरातील आफताब मंगल कार्यालय येथे आयोजित करन्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात विशेषता उप- प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी  राजेन्द्रं  केसकर व देवरी पोलिस्टेसनचे ठाणेदार प्रविण डांगे प्रामुख्याने उपस्तीत राहनार आहे. सोबत शिव उद्योग संघटना व प्लीट कंपनीचे पदाधिकारी या रोजगार मेळाव्यास उपस्तीत राहनार असुन रोजगाराची खरी ग्यारंटी व सोबतच बेरोजगार परवाना धारकांना रोजगार या रोजगार मेळाव्यातच उपलब्ध करुन देन्यात येनार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात उद्या  दि. 13 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 11.00 वाजता ते दुपारी 3.00 वाजता पर्यंत आफताब मंगल कार्यालयात रोजगार मेळावा घेन्यात येनार आहे. या रोजगार मेळाव्यात चारचाकी परवाना धारकांनी जास्तीत जास्त संखेत भेट देऊन चालत आलेल्या रोजगार संधीचा लाभ घेन्याचे आवाहन आयोजकांकडुन करन्यात आले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें